Pune Pimpri Chinchwad Crime News | मेट्रोच्या सिक्युरिटी सुपरवायझरला मारहाण करुन चारचाकी गाडीची तोडफोड, नदीपात्रातील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या रागातून मेट्रोच्या (Pune Metro) सिक्युरिटी सुपरवायझरला (Security Supervisor) धक्काबुक्की करुन कंपनीच्या चारचाकी गाडीची तोडफोड करुन नुकसान केल्याची घटना शनिवारी (दि.23) घडली आहे. हा प्रकार ताडीगुत्ता नदीपात्रात रात्री साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Pune Police) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत जयंत बबन पिसाळ (वय-52 रा. कवडे वस्ती, वाघोली, पुणे) यांनी रविवारी (दि.24) येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन गोल्ड्या उर्फ सचिन गवळी (वय-30), मंगेश (वय-25 पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 324, 504, 506, 427, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ताडीगुत्ता नदीपात्रात
सुरु असलेल्या मेट्रोच्या कामावर सिक्युरिटी
सुपरवायझर म्हणून काम करत आहेत.
आरोपींनी जुन्या रागातून फिर्यादी काम करत असलेल्या जे.
कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (J. Kumar Infraproject Pvt. Ltd.)
या कंपनीच्या कामगारांना धक्काबुक्की केली. तसेच कंपनीची बोलेरो कॅम्पर गाडीची लाकडी फावड्याच्या दांडक्याने तोडफोड करुन नुकसान केले. तर फिर्यादी यांनी लाकडी फावड्याने मारहाण करुन जखमी करुन बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.