Pune Pimpri Chinchwad Crime News | महिलेसोबत गैरवर्तन करुन विनयभंग, दोघांवर गुन्हा दाखल; महंमदवाडी परिसरातील प्रकार

Molestation Case

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | फर्निचरचे काम पूर्ण केले नाही म्हणून महिलेला अश्लील शिवीगाळ (Obscene Abuse) केली. तसेच महिलेला ढकलून देत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation) केला. तर आरोपीच्या आईने पोलिसांत खोटी तक्रार देण्याची धमकी दिली. हा प्रकार महंमदवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत बालेवाडी येथे राहणाऱ्या महिलेने गुरुवारी (दि.21) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फरमान कादर अली (वय-22) व त्याच्या आईवर आयपीसी 354, 354अ, 323, 504, 506, 507, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिलेचा महंमदवाडी येथील के.के. गॅरेजच्या (K.K. Garage) जवळ फर्निचर बनवण्याचा कारखाना (Furniture Factory) आहे. आरोपींनी फिर्य़ादी यांना फर्निचर बनवण्याचे काम दिले होते. मात्र, फर्निचर बनवण्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे आरोपींनी कारखान्यात येऊन महिलेसोबत वाद घातला. तसेच आरोपी फरमान अली याने फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ करुन ‘जिंदा गाड दुँगा’ अशी धमकी देऊन महिलेचा हात पिरगाळला. त्याने महिलेला ढकलून देत गैरवर्तन करुन विनयभंग केला. तसेच आरोपीच्या आईने पोलिसांकडे खोटी तक्रार देण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव (API Sukeshini Jadhav) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा