Dandruff Prevention | हिवाळ्यात वाढत्या कोंड्यामुळे तुम्हीही झाले हैराण? करा काही सोपे घरगुती उपाय….

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – अनेकांना हिवाळा हा ऋतू खूप आवडतो (Dandruff Prevention). मात्र हिवाळा येताच आपल्याला आरोग्यासंबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यातच हिवाळा आला की, केसांमध्ये कोंड्याची समस्या हमखास निर्माण होते. कोंडा तुमचे केस खराब करतो (Dry Hair). हिवाळ्याच्या काळात टाळूमध्ये कोरडेपणा येतो (Hair Problem In Winter), त्यामुळे कोंडा होण्याचा धोका वाढतो. जाणून घेऊया थंड वातावरणात केसांना कोंडापासून कसे वाचवायचे (Dandruff Prevention).

1.नियमित केस धुणे (Wash your hair regularly) –

केस नियमितपणे धुणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या केसांमध्ये साचलेली घाण, तेल आणि रसायने टाळण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा तरी केस धुवावेत, कारण स्वच्छ केसांमुळे कोंडा होण्याचा धोका कमी असतो.

2. तेलाने मालिश करणे (Massage with oil) –

हिवाळ्यात केसांना तेल लावणे खूप गरजेचे असते. तेलामुळे केसांना आवश्यक पोषण मिळते आणि स्काल्प कोरडे होत नाहीत. तुमच्या केसांना आर्गन ऑईल (Argan Oil) किंवा खोबरेल तेलाने (Coconut Oil) मुळापर्यंत मसाज केल्याने कोंड्याची वाढ थांबते.

3. कोमट पाण्याने मसाज करा (Massage with Warm Water) –

हिवाळ्यात दररोज केसांना मसाज केल्याने कोंडा टाळण्यास मदत होते.
कोमट पाण्याने मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते. तसेच त्वचा ताजी दिसते.
तसेच केसांना चमक सुद्धा येते (Silky And Shiney Hair).
यामुळे तुमचे केस पूर्वीपेक्षा अधिक सुंदर होतात (Dandruff Prevention).

4. सौम्य शाम्पू वापरा (Use Mild Shampoo) –

हिवाळ्यात वापरण्यासाठी योग्य शाम्पू निवडणे महत्वाचे आहे, अन्यथा तुमचे केस लवकर खराब होऊ शकतात.
आपण हिवाळ्यात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सौम्य शैम्पू वापरू शकतो (Shampoo For Dandruff).

5. निरोगी आहार घ्या (Eat Healthy Diet) –

शरीराच्या एकूण आरोग्यासाठी सकस आणि संतुलित आहार महत्त्वाचा आहे.
सकस आहार केसांच्या टाळूला पुरेसे पोषण देखील देते, ज्यामुळे कोंड्याची समस्या (Dandruff Problem) टाळता येते.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Leave A Reply

Your email address will not be published.