Pune Pimpri Chinchwad Crime News | सिंगापूरमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने 11 लाखांची फसवणूक, दोघांवर FIR; कात्रजमधील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन –  Pune Pimpri Chinchwad Crime News | परदेशात नोकरी (Job Abroad) लावण्याचे आमिष दाखवून मेलवर खोटी कागदपत्र पाठवून 11 लाख रुपये घेतले. मात्र नोकरी न लावता आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केली. याप्रकरणी दोन जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 एप्रिल 2021 ते आजपर्य़ंत कात्रज येथील प्लाझा गॅरेज येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत जयेश नवीनचंद्र मामतोरा Jayesh Navinchandra Mamtora (रा. वानवडी) यांनी गुरुवारी
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन प्रदीप दिनकर इळके (रा. प्लॉट नं. 16 ग्रीन लॉन सोसायटी, सुखसागरनगर, कात्रज), रवी सिंग तोमर (रा. मेरठ) यांच्यावर आयपीसी 420, 406, 465, 468, 469, 471, 427, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादी यांचा मुलगा जश मामतोरा याला सिंगापूर (Singapore) येथे
नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन मुलाला सिंगापूर येथे नोकरी
लावण्यासाठी वेळोवेळी 10 लाख 88 हजार 885 रुपये घेतले.

तसेच फिर्यादी यांच्या ईमेल आयडीवर बनावट व खोटे कागदपत्र पाठवले.
आरोपींनी संनमत करुन फिर्यादी यांच्या मुलाला नोकरी न लावता आर्थिक फसवणूक केली.
तसेच फिर्यादी यांच्या मुलाला दोन वेळा सिंगापुर येथे पाठवले.
त्याच्या जाण्या-येण्याचा व तेथील राहण्याचा 3 लाख 24 हजार 323 रुपये खर्च होवून आर्थिक नुकसान केल्याचे
फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक थोरात (PSI Thorat) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.