Pune Pimpri Chinchwad Crime News | कठीण वस्तूने डोक्यात वार करुन वेटरचा खून, पुण्यातील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | कठीण वस्तूने डोक्यात वार करुन हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका वेटरचा खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.19) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वडगाव पठार येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Pune Police) दोन अज्ञात व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

सुनिलकुमार राम आसरे (वय-25 सध्या रा. मैत्री हॉटेल, आंबेगाव बु., पुणे, मुळ रा. चमका बनी, पोस्ट भरवा, जि. हरदोई, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मयत आसरे याचे नातेवाईक सुशिलकुमार (वय-25 रा. गंगाई हाईट्स, हॉटेल मैत्री, आंबेगाव बु.) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध आयपीसी 302, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनीलकुमार आसरे हा मैत्री हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता.
आज्ञात आरोपींनी कोणत्यातरी कारणावरुन सुनीलकुमार
याच्या डोक्यात कठीण वस्तूने मारुन गंभीर जखमी करुन त्याचा खून केला.
तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दीपक कादबाने (API Deepak Kadbane) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनीलकुमार हा मैत्री हॉटेलमध्ये राहाण्यास होता. त्याचे आणि आरोपी यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाले. याच वादातून सुनीलकुमार याच्या डोक्यात कठीण वस्तुने मारुन त्याचा खून केला. आरोपींचा शोध सुरु असून लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.