Pune Crime News | शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण, तिघांवर FIR; लोणी काळभोर परिसरातील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | विनाकारण शिवीगाळ करत असल्याचा जाब विचारला असता तिघांनी एका तरुणाला बेदम मारहाण (Beating) करुन डोक्यात दगड घातला. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी तीन जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.17) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती येथील ईराणी गल्लीत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत शादाब नजीर इनामदार (रा. पठारे वस्ती, कदमवाक वस्ती, ता. हवेली) याने सोमवारी (दि.18) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अब्बास ईराणी (रा. ईराणी वस्ती, कदमवाक वस्ती) याच्यासह इतर दोन अनोळखी मुलांवर आयपीसी 323, 324, 504, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी अब्बास ईराणी हा फिर्य़ादी यांना विनाकारण वारंवार शिवीगाळ करत होता. रविवारी रात्री शादाब हा ईराणी गल्लीतील शिवरत्न मित्र मंडळ समोरील रस्त्यावरुन जात होता. त्यावेळी आरोपीने त्याला शिवीगाळ केली. शादाब याने याचा जाब विचारला असता आरोपींनी संगनमत करुन त्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर अब्बास ईराणी याने त्याठिकाणी पडलेला दगड शादाबच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धायगुडे (PSI Dhaygude) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.