Pune Crime News | अश्लील हावभाव करुन महिलेचा विनयभंग, भवानी पेठेतील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | महिलेचा पाठलाग करुन तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्याकडे पाहून अश्लिल हावभाव करुन विनयभंग (Molestation) केला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या आईला धक्काबुक्की केल्याचा प्रकार भवानी पेठेत (Bhawani Peth) घडला आहे. हा प्रकार जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत वारंवार घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत भवानी पेठेत राहणाऱ्या पीडित महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अनिल ढसाळ (रा.भवानी पेठ) याच्यावर आयपीसी 354ड, 509, 323 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. आरोपीने अनिल ढसाळ याने महिलेसोबत विनाकारण बोलण्याचा वेळोवेळी प्रयत्न कला. त्याने महिलेची चौकशी करण्याच्या बहाण्याने पाठलाग केला. (Pune Crime News)

तसेच रस्त्याने येता जाता तोंडाने अश्लील हावभाव करुन विनयभंग केला.
याबाबत पीडित महिलेच्या आईने आरोपीकडे जाब विचारला.
त्यावेळी त्याने महिलेच्या आईला धक्का देऊन वाद घातला.
महिलेच्या भावाने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यालाही धक्काबुक्की
केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर साठे (PSI Sudhir Sathe) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.