Pune Crime News | येरवडा येथील हॉटेल पार्क ऑर्नेट हॉटेलमधील शेफ कडून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | हॉटेलमधील अंडे चोरल्याच्या संशयावरून महिला कर्मचाऱ्याला कपडे उतरवण्यास भाग पाडून तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हॉटेलमध्ये घडला आहे. येरवडा येथील हॉटेल पार्क ऑर्नेटच्या (Park Ornate Hotel Pune) शेफने हॉटेलमधील 50 वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर अंडी चोरल्याच्या कारणावरुन विनयभंग केला. हा प्रकार 26 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत येरवडा येथे राहणाऱ्या 50 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन हॉटेल मधील शेफ (Cook) मुकेश सिंह पुन्डील Mukesh Singh Pundil (वय-31 रा. हॉटेल पार्क ऑर्नेट, येरवडा) याच्यावर आयपीसी 354, 354अ, 341, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पुन्डील हा पार्क ऑर्नेट या हॉटेल मध्ये शेफ म्हणून काम करतो. तर पीडित महिला याच हॉटेलमध्ये कामाला आहे. मुकेश पुन्डील याने महिलेला तुम्ही वेळेवर ड्युटीवर येत नसल्याचे बोलून वाईट नजरेने पाहिले. महिलेने त्याला त्यांचे ड्युटी रजिस्टर तपासण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने महिलेला अश्लील शिवीगाळ (Obscene Abuse) केली.

यानंतर आरोपीने पीडित महिलेवर तू अंडे कुठे लवपवून ठेवले आहेत,
असे म्हणून तिची अंग झडती घेऊन तिला कपडे उतरवण्यास भाग पाडले.
तसेच महिलेचा रस्ता अडवून अश्लील शेरेबाजी करत नोकरी घालवण्याची धमकी
दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.