Pune Job Fair | दत्ताभाऊ सागरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात रोजगार मेळावा

Pune Job Fair

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Job Fair | नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. पुण्यात येत्या रविवारी (दि.17) रोजगार मेळावा भरणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाईला नामवंत कंपन्या, कारखाने, उद्योगसमूहाच्या माध्यमातून उत्तम रोजगाराच्या (Pune Job Fair) संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. माजी विरोधी पक्षनेते दत्ताभाऊ सागरे (Dattabhau Sagare) यांच्या वाढदिवसानिमित्त या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रोजगार मेळावा (Pune Job Fair ) आनंद दत्ताभाऊ सागरे यांच्या जनसंपर्क कार्य़ालय, लक्ष्मी रोड, सिटी पोस्ट चौकाच्या अलीकडे बुधवार पेठ येथे होणार आहे. रविवारी (दि.17) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या दरम्यान रोजगार मेळवा होणार आहे. या मेळाव्यात 21 नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे.

इयत्ता पाचवी ते पदवीधर, एम.बी.ए., डिप्लोमा, आय.टी.आय, एमसीव्हीसी पास तसेच अंतिम पदवी पक्षीक्षेस
बसणाऱ्या विद्यर्थ्यांना सुवर्ण संधी आहे. या रोजगार मेळाव्यात 18 ते 45 वयोगटातील सर्वजण सहभागी होऊ शकतात.
उमेदवारांनी नोकरी महोत्सवासाठी येतना आपला बायोडाटा च्या किमान पाच प्रती घेऊन याव्यात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा