Pune Crime News | पार्सल तर मिळालेच नाही पण खात्यातून गेले पाच लाख, आंबेगाव येथील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | सायबर गुन्हेगार (Cyber Criminals) नागरिकांची फसवणूक (Fraud) करण्यासाठी वेगळ्या युक्त्या वापरत असतात. फसवणूक करणारे आता ब्लू डार्ट सारख्या प्रसिद्ध कुरिअर कंपनीच्या (Blue Dart Courier Company) नावाचा वापर करत आसल्याचे समोर आले आहे. पुण्यातील एका व्यक्तीने ब्लु डार्ट वरून पार्सल मागवले होते. पार्सल आले नाही मात्र त्या व्यक्तीचे बँक खाते रिकामे झाले. सायबर गुन्हेगारांनी 41 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 4 लाख 90 हजार रुपये ट्रान्सफर करुन घेत फसवणूक केली. (Pune Crime News)

याबाबत अमित अशोक पालीवाल (वय-41 रा. आंबेगाव खुर्द, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 78498XXXXX मोबाईल धारक व बँक खाते धारक यांच्यावर आयपीसी 419, 420, आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.11) सायंकाळी सहा ते मंगळवार (दि.12) या कालावधीत फिर्यादी यांच्या राहत्या घरी ऑनलाईन घडला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी अमित पालीवाल यांनी ब्लु डार्ट कंपनीकडून पार्सल मागवले होते. मात्र, पर्सल आले नाही. त्यामुळे अमित यांनी गुगलवर कंपनीचा नंबर सर्च केला. त्यावेळी त्यांना 7849889357 हा क्रमांक मिळाला. फिर्यादी यांनी या क्रमांकवर संपर्क साधून पार्सल बाबत चौकशी केली.

त्यावेळी मोबाइल धारकाने फिर्यादी यांना युआरएल आयडी पाठवून
फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 4 लाख 90 हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अमित पालीवाल यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Sr. PI Vinayak Gaikwad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.