Pune Crime News | पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने धनकवडी येथील तरुणीची आर्थिक फसवणूक

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | टास्क, लाइक, सबस्क्राइब आणि पार्ट टाइम नोकरीचे प्रलोभन दाखवून फसवणूक (Fraud) करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर पोलिसांकडून (Cyber Police) वारंवार सतर्क करूनही सर्वसामान्य नागरिक त्यांना असलेल्या अज्ञानामुळे सायबर चोरांच्या (Cyber Thieves) जाळ्यात अडकत आहेत. केवळ तरुणच नाही तर जेष्ठ नागरिकांची देखील फसवणूक केली जात आहे. धनकवडी येथील एका तरुणाला पार्ट टाईम जॉबचे (Part Time Job) आमिष दाखवून त्याची पावणे दोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Crime News)

याबाबत तळजाई पठार, धनकवडी (Dhankawadi) येथे राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन 8601208725 मोबाईल धारक, आरती अहुजा सह पाच टेलिग्राम (Telegram) आयडी धारकांवर आयपीसी 420, 34 सह आयटी अ‍ॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 11 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने झाला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 8601208725 क्रमांकाच्या मोबाईलवरुन व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आला.
मेसेज करणाऱ्या व्यक्तीने आपण आरती अहुजा (Aarti Ahuja) असून गुगल प्रमोशनचे (Google Promotion) काम
करत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना प्रमोशन रन करण्यासाठी दिलेल्या लिंकवर रीविव्ह करण्याचा पार्ट टाईम जॉब
असल्याचे सांगून जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवले.

फिर्यादी यांनी सहमती दर्शवल्यानंतर त्यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये अ‍ॅड करुन घेतले.
सायबर चोरट्यांनी सुरुवातीला काही रक्कम देऊन तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 1 लाख 74 हजार रुपये परस्पर काढून घेतले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेत सायबर चोरट्यांविरुद्ध तक्रार दिली.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे (Sr. PI Surendra Malale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.