Pune Crime News | पैसे क्रेडिट झाल्याचे खोटे मेसेज पाठवत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक, पुण्यातील घटना

Fraud

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) पैसे क्रेडिट झाल्याचे खोटे मेसेज पाठवून एका ज्येष्ठ नागरिकाला गंडा (Fraud) घातल्याची घटना घडली आहे. आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईलवर फोन करुन ‘मैं शर्माजी बात कर रहा हूँ ।’ म्हणत फसवणूक केली. हा प्रकार 7 डिसेंबर 2023 रोजी घडला. (Pune Crime News)

या प्रकरणी आंबेगाव खुर्द परिसरात राहणाऱ्या एका 59 वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 81092XXXXX, 95974XXXXX, 81488XXXXX, 89621XXXXX क्रमांकाच्या मोबाईल धारकांवर आयपीसी 420, 419 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अनोळखी क्रमांकावरुन फोन आला.
समोरच्या व्यक्तीने ‘मैं शर्माजी बात कर रहा हूँ’ चुकून तुमच्या बँक खात्यावर पैसे पाठवले आहेत, असे सांगितले.
फिर्यादी यांना पत्नीच्या परिचयाचे शर्माजी असल्याचा समज झाला.
त्यानंतर सायबर चोरट्यांनी पैसे क्रेडिट झाल्याचे खोटे मेसेज पाठवून फिर्यादी यांची दिशाभूल केली. तुम्हाला आलेले पैसे चुकून आले असून ते परत पाठवा असे सांगितले. फिर्यादी यांनी चार वेगवेगळे ट्रान्झॅक्शन करुन 54 हजार पाठवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नराळे (PSI Narale) करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा