Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; कर्वेनगर परिसरातील प्रकार
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध (Pune Minor Girl Rape Case) ठेवले. यातून पीडित मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नराधमावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Pune Police) पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुन 2023 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत कर्वेनगर येथील आरोपीच्या घरी घडला. (Pune Crime News)
याबाबत 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन साहील भरत सावंत Sahil Bharat Sawant (रा. कर्वेनगर) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन सह पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहात असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
पीडित तरुणी आरोपीच्या घरी गेली असता आरोपीने तिचे तोंड दाबून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध
प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीने मुलीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
तसेच याबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारून टाकण्याची धमकी (Threats to kill) दिली. दरम्यान, पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात फिर्याद दिली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- सुरक्षा डोअर गोदामाला भीषण आग; लोणी काळभोरमधील घटना
- टँकरने होणारी पाण्याची ‘चोरी’, ‘धंदा’ आणि ‘गळती’ला महापालिकेचा लगाम ! रामटेकडी आणि वडगाव शेरी टँकर भरणा केंद्राचे ‘ऍटोमायझेशन’ सुरू
- 23 हजार 628 पोलिस शिपाई पदे भरली जाणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- संसदेतील घुसखोरीच्या घटनेचे विधानसभेत पडसाद, अध्यक्षांनी घेतला महत्वाचा निर्णय
- दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड