Pune Crime News | खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी परिसरातून चंदनच्या झाडाची चोरी, दोघांना अटक

Sandalwood Theft

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चंदन चोरीच्या (Sandalwood Theft) घटना वाढल्या असून, चंदनाच्या अनेक झाडांची चोरी झाली आहे. यातील बहुतांश झाडे महत्त्वाच्या संस्था, कंपन्यांच्या आवारातील असल्याने या परिसरातील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी (Khadki Ammunition Factory) परिसरातील मुळा हाऊस येथे सुरक्षा रक्षकाला करवतीचा धाक दाखवून चंदनाचे झाड चोरुन नले. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Pune Police) दोघांना अटक केली आहे. (Pune Crime News)

याबाबत अनिल भगवान भागवत (रा. निम्हन आळी, पाषाण, पुणे) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अशोक भिमाजी गांगड, राजेंद्र रामदास डोके ( दोघे रा. मु.पो. आंबेगव्हान, ता. जुन्नर) यांना अटक (Arrest) केली आहे. तर त्यांच्या इतर अनोळखी साथीदारावर आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.12) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मुळा हाऊस येथे घडला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी हे अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी परिसरातील मुळा हाऊस येथे सुरक्षा रक्षक आहेत.
मंगळवारी पहाटे आरोपींनी त्यांच्या हातातील करवतीचा धाक फिर्य़ादी यांना दाखवला.
यानंतर त्यांच्या खिशातील 450 रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
तसेच इतर दोन आरोपींनी त्याठिकाणी असलेले चंदनाचे झाड कापुन घेऊन गेले.
याबाबत भागवत यांनी खडकी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तपास पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव मकदुम (PSI Vaibhav Makdum) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा