Maharashtra Board Class 10th-12th Result 2024 | दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली मोठी अपडेट, असा पहा निकाल

0

पुणे : Maharashtra Board Class 10th-12th Result 2024 | यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्याथ्र्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. निकाल कधी लागणार, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले असताना बोर्डाच्या अध्यक्षांकडून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. मात्र, अजूनही दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षा राज्यभरात १ मार्च ते २६ मार्च २०२४ यादरम्यान पार पडल्या. आता दहावीच्या निकालाबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठी माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, यंदा दहावीचा निकाल हा मेच्या चौथ्या आठवड्यात लागेल. अगोदर बारावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर लगेचच पुढच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल. यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली आहे.

असा पाहू शकता निकाल

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या
  • वेब साईटवर दहावीचा निकाल पाहू शकता. यासाठी विद्याथ्र्याचा परीक्षा क्रमांक आवश्यक आहे.
  • mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जा, आणि निकाल पहा
Leave A Reply

Your email address will not be published.