Kopa Mall Pune | कोपा मॉलतर्फे लहान मुलांसाठी हॅम्लेज ‘हाउस ऑफ मेस’चं आयोजन

0

पुणे : Kopa Mall Pune | कोपा मॉल या पुण्यातील आघाडीच्या लाइफस्टाइल डेस्टिनेशनला हॅम्लेजच्या सहकार्याने ‘हाउस ऑफ मेस’चं आयोजन करताना आनंद होत आहे. या कार्यक्रमात लहान मुलांना पसाऱ्याचं विश्व आणि त्यातून उलगडणारी कल्पकता अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात चार आठवडे मजा, मस्ती, कल्पकता यांचा अनुभव घेता येणार आहे. हा कार्यक्रम १८ मे ते ९ जून दरम्यान दर शनिवार आणि रविवारी दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत होणार आहे.

‘हाउस ऑफ मेस’मध्ये मुलांसाठी विज्ञान, कागद, द्रवपदार्थ असे विविध विषय तसेच त्यांच्या जाणिवांना चालना देणारे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. थरारक ज्वालामुखीपासून स्लाइमचे वैज्ञानिक प्रयोग व कागदापासून सँड आर्टपर्यंत वेगवेगळ्या, कल्पनाशक्ती व कल्पकतेला वाव देणारे उपक्रम यात घेतले जाणार आहेत. मुलांना प्ले-डोचा आनंद घेता येईल, स्वतःच्या नावाची ब्रेसलेट्स बनवता येतील, कार वॉश साहसामध्ये भाग घेता येईल आणि नंबर रंगवणे व कनेक्ट-द-डॉट्स चॅलेंज अनुभवता येईल. त्याशिवाय फोटो बुथ आणि झोका असलेला बॉल पिट बच्चेकंपनी आणि त्यांच्या कुटुंबाला मजामस्ती करण्याची संधी देण्यासाठी सज्ज आहे.

कार्यक्रमाचे तपशील:

कार्यक्रम – ‘हाउस ऑफ मेस’ बाय हॅम्लेज

तारीख – १८ मे ते ९ जून – शनिवार आणि रविवार

वेळ – दुपारी १२ ते रात्री ९

स्थळ- कोपा मॉल, कोरेगाव पार्क

इथे आल्यानंतर मुलांना एप्रन व बॅग देऊन स्वतःच्या नावाने सजवण्यास सांगितले जाणार असून त्यामुळे हा कार्यक्रम मुलांना आपलासा वाटण्यास अधिक मदत होईल. ‘हाउस ऑफ मेस’मध्ये उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, मात्र त्याचबरोबर मुलांच्या दीर्घकाळ लक्षात राहील अशा आठवणी त्यांना देण्याचा प्रयत्न आहे. नाममात्र शुल्कामध्ये मुलांना भरपूर आठवणी आणि सर्जनशीलता, उत्सुकता व आत्मविश्वासही सोबत परत नेता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.