Manoj Jarange Patil | जरांगेंचा भुजबळ-पडळकरांना इशारा, ‘जीभेला आवर घाला’; फडणवीसांवर केला आरोप, ‘गोड बोलून डाव टाकायचे…’

0

लातूर : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर लातूर येथील सभेनंतर पत्रकारांशी बोलताना जोरदार हल्ला चढवला. तसेच जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले, गोड बोलायचे आणि डाव टाकायचे असं फडणवीस करत आहेत. आता पहिल्यासारखे मराठे राहिले नाहीत. ते कोणत्याही टोकाला जावू शकतात याचे भान ठेवून गांभीर्याने निर्णय घ्या. छगन भुजबळांचे ऐकून निर्णय घेणार असाल तर परिणाम शंभर टक्के भोगावे लागणार.

देवेंद्र फडणवीसांना उद्देशून मनोज जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आले पाहिजे की राज्यात शांतता राहिली पाहिजे. आपण सरकार चालवताय. फडणवीसांनी जो जो शब्द दिला त्याचा सन्मान मराठ्यांनी केला आहे. मराठा समाज शांत राहिला आहे. गुन्हे मागे घेतो असंही फडणवीस म्हटले तरी अटक सुरूच आहे. नेमका तुमच्या मनात डाव काय याचे स्पष्टीकरण फडणवीसांनी दिले पाहिजे.

फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे पुढे म्हणाले, तुम्हाला थांबायचे नसेल तर आम्ही तुम्हाला ओळखले आहे. तुम्ही मराठ्यांशी खेटू नका. ही धमकी आणि इशारा नाही. मराठ्यांनी तुम्हाला १०६ आमदार दिलेत. त्याची परतफेड डाव टाकून मराठ्यांना संपवून करू नका. तुमचे ५-७ लोक नेहमी मराठ्यांवर गरळ ओकत आहेत. तुम्हाला याचे गांभीर्य नसेल तर परिणाम २४ डिसेंबर नंतर दिसतील. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही आणि हे बुजगावणे थांबवले नाहीत तर यांना उठवायला आम्हाला वेळ लागणार नाही. या लोकांना आवरा, २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या.

छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल करताना जरांगे म्हणाले, भुजबळ-पडळकर यांनी आता थांबावे, जातीय तेढ निर्माण करू नये. यामधून काही मिळणार नाही. माझी त्यांना शेवटची विनंती की, जीभेला आवर घाला. मराठा-ओबीसी बांधवांमधील संबंध खराब करू नका. राज्यात शांतता आणि सलोखा पाहिजे. गावखेड्यातील मराठा-ओबीसी एकमेकांच्या मदतीला धावतात. तुम्ही राजकीय स्वार्थासाठी गोरगरिबांमध्ये झुंज लावू नका.

जरांगे म्हणाले, गोपीचंद पडळकर हे सामाजिक चळवळीतील आहेत. त्यांच्याबद्दल मनात आकस नाही.
त्यांनीसुद्धा मराठा समाजाबद्दल आकस ठेऊ नये. समाजाच्या दु:खाची जाण त्यांना आहे.
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ज्या वेळी बोलले ते त्यांनी केले आहे.
शिंदे जेव्हा चुकले तेव्हा आम्ही बोललो आहे. आता शिंदेंनी २४ डिसेंबरपर्यंत वेळ घेतला आहे.

जरांगे म्हणाले, आतापर्यंत ३५ लाख घरापर्यंत आरक्षण दिले, समिती काम करत आहे.
काही ठिकाणी अधिकारी मराठ्यांच्या नोंदी सापडू देत नाही. जातीय रंग देत आहेत.
त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी.
एकनाथ शिंदे हे मराठ्यांना आरक्षण देतील असा विश्वास आहे.
परंतु त्यांनी नाही दिले तर मुख्यमंत्र्यांविरोधातही दंड थोपटू.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | अंतरवाली सराटीमधील लाठीचार्जवरून जरांगेंची जोरदार टीका, ”देवेंद्र फडणवीस काड्या करत राहिले तर…”

Leave A Reply

Your email address will not be published.