Prithviraj Chavan On Devendra Fadnavis | पृथ्वीराज चव्हाण यांचा फडणवीसांना खोचक सवाल, सिंचन घोटाळ्यातील तो शोध पंतप्रधानांना का सांगितला नाही?

0

मुंबई : Prithviraj Chavan On Devendra Fadnavis | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) सिंचन घोटाळ्याबाबत (Irrigation Scam Maharashtra) जाहीर भाषणातून टिपण्णी करत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर काही दिवसातच अजित पवार त्यांच्या काही समर्थकांसह भाजपासोबत (BJP) गेले. यावरून देशभरात सातत्याने भाजपावर टीका होत असते. आज देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत बोलताना अजित पवारांना पुन्हा एकदा क्लिनचिट देण्याचा प्रयत्न केला. यानंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अजित पवार यांना मंत्री करण्यापासून ते सोबत घेण्यापर्यंत भाजपचा मोठा विरोध होता. सिंचन घोटाळा, बँक घोटाळा हे पंतप्रधानांनी सांगितले. एवढे आरोप असलेल्या अजित पवारांना यापुढे सोबत घेऊ नका असेही त्यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना हा जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केले पाहिजे. जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितले नाही?

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पंतप्रधानांनी केलेला आरोप ग्राह्य धरायचा की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ते ग्राह्य धरायचं? मी मुख्यमंत्री असताना त्यांच्याच विभागाने मला ही माहिती दिली होती.

आजच्या मोदी-ठाकरेंच्या सभेबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मनसेकडून आज मुंबईत पंतप्रधानांची सभा बोलावली आहे. त्यामुळे किमान आज त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले पाहिजे. आम्ही ही लढाई सुरु केली होती.

राज ठाकरेंवर (Raj Thackeray) टीका करताना चव्हाण पुढे म्हणाले, २०१९ मध्ये पंतप्रधानांनी सात सभा घेतल्या होत्या. आता २० च्यावरती सभा झाल्या आहेत. मनसेने ही सभा (MNS Sabha) आयोजित केली आहे याचा आश्चर्य वाटते. मागील निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदींवर सडकून टीका केली होती. आता ते सभेला बोलवतात. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हटले, मी तसे म्हणणार नाही. मात्र, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहे असे वाटते.

त्यांनी कोणाची मदत घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे. राज ठाकरेंना सोबत घ्यावे, अजित पवारांना सोबत घ्यावे की प्रकाश आंबेडकरांची अप्रत्यक्ष मदत घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे, असा टोला चव्हाण यांनी लगावला.

सिंचन घोटाळ्याबाबत काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस…

कथित ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले की, अजित पवार हे त्या खात्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही आरोप केले. त्यांना जबाबदार धरणे साहजिकच होते. तपास यंत्रणांनी सर्व काही तपासले. परंतु कोणत्याही आरोपपत्रात, यंत्रणांनी अजित पवारांवर थेट भूमिका असल्याचे म्हटलेले नाही. आपल्याला यंत्रणा आणि त्यांच्या तपासाला सामोरे जावे लागते.

Leave A Reply

Your email address will not be published.