Pune Crime News | सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांकडून अटक, पिस्टल जप्त

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल व काडतुस जप्त केले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.8) समोवार पेठ पोलीस चौकी जवळील समर्थ व्यायाम मंदिरासमोर केली. सिद्दीक रफिक खान (वय-24 रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे अटक (Arrest) केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. (Pune Crime News)

समर्थ पोलीस ठाण्यातील (Samarth Police Station) तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक सौरभ थोरवे (PSI Saurabh Thorve) यांना माहिती मिळाली की, सोमवार पेठ पोलीस चौकी (Somwar Peth Police Chowky) जवळ असलेल्या समर्थ व्यायाम मंदिरासमोर रेकॉर्डवरील गुन्हेगार सिद्दीक खान मित्राला भेटण्यासाठी येणार आहे. त्याच्याकडे पिस्टल आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक पिस्टल (Pistol) व एक काडतूस असा एकूण 10 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीवर यापूर्वी एक शरिराविरुद्धचा गुन्हा दाखल आहे. (Pune Crime News)

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 संदीप सिंह गिल (DCP Sandeep Singh Gill), सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ
(ACP Ashok Dhumal), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर (Sr PI Suraj Bandgar),
पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे (PI Pramod Waghmare) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे (PSI Sunil Ranadive), सौरभ थोरवे, अक्षयकुमार गोरड (PSI Akshay Kumar Gord), दिपक यादव (PSI Deepak Yadav)पोलीस अंमलदार दत्तात्रय भोसले, प्रमोद जगताप, गणेश वायकर, संतोष डमाले, रोहीदास वाघेरे, रहीम शेख, हेमंत पेरणे, अमोल शिंदे, वैशाली परदेशी, रागिनी शिंदे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.