Pune Crime News | किरकोळ कारणावरुन कुटुंबाला मारहाण, महिलेच्या अंगावरील कपडे फाडून केला विनयभंग; वडगाव शेरी परिसरातील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | घराजवळ सुरु असलेल्या बांधकामाचा मिक्सर बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन कुटुंबाला मारहाण (Beating) केली. तसेच महिलेच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार वडगाव शेरी येथे घडला आहे. याप्रकरणी ठेकेदारासह दोघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.3) दुपारी एकच्या सुमारास वडगाव शेऱी (Wadgaon Sherry) येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडित महिलेच्या 44 वर्षीय पतीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) बुधवारी (दि.6) फिर्याद दिली आहे. यावरून ठेकेदार कृरलत्तीन चौधरी (Contractors Kriralattin Chaudhary) व शशीकांत कातोरे Shashikant Katore (रा. वडगाव शेरी) यांच्यावर आयपीसी 354, 325, 323, 427, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या शेजारी बांधकाम चालु आहे.
या बंधकामाचा मिक्सर फिर्य़ादी यांच्या घराच्या खिडकीला चिकटुन लावला होता.
त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींना तो मिक्सर बाजुला घेण्यास सांगितले.
याचा राग आल्याने आरोपींनी फिर्य़ादी यांच्यासोबत वाद घातला. त्यावेळी फिर्यादी यांची आई वाद सोडवण्यासाठी आल्या असता आरोपीने तिच्या कानशीलात लगावली. तर भावाची करंगळी पिरगाळून फ्रॅक्चर केली. तसेच फिर्य़ादी यांच्या पत्नीच्या अंगावरील कपडे फाडून स्त्री मनास लज्जा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर बलात्कार, लोणी काळभोर परिसरातील घटना

PSI- Cop Dismissed In Pune | पुण्यात महिला पोलिस अधिकार्‍यासह दोघे सेवेतून बडतर्फ, जाणून घ्या प्रकरण

ACB FIR On Kiran Lohar | लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता; ‘एसीबी’कडून गुन्हा दाखल

Maharashtra Police News | नशेबाजाकडून दोन पोलिसांना जबर मारहाण

Leave A Reply

Your email address will not be published.