Pune Crime News | डर्टी पिक्चर ! पतीला कामावरुन काढून टाकण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार, वाघोली परिसरातील घटना

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पतीला कामावरुन काढून टाकण्याची धमकी देऊ महिलेवर वारंवार अत्याचार (Rape In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथील लोकमंगल कारखान्यातील (Lokmangal Factory Lohara) सुपरवायझरवर (Supervisor) पुण्यात गुन्हा (Pune Police) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2017 ते 2018 दरम्यान आणि 9 नोव्हेंबर रोजी घडला आहे. आरोपीने पीडित महिलेवर लोहारा आणि वाघोली परिसरातील निर्जन स्थळी अत्याचार केला आहे. (Pune Crime News)
याबाबत वाघोली येथे राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) मंगळवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. यावरुन अंकुश मन्नु राठोड Ankush Mannu Rathod (रा. जळकोट रामतिर्थ तांडा, उस्मानाबाद) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 323, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिलेचे पती लोहारा येथील लोकमंगल कारखान्यात कामाला आहेत.
तर आरोपी महिलेच्या पतीचा सुपरवायझर आहे. त्याने पतीला कामावरुन काढून टाकण्याची व मुलांना मारुन
टाकण्याची धमकी (Threats to Kill) दिली. तसेच महिलेला हाताने मारहाण (Beating) करुन जबरदस्तीने
शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने लोहारा आणि वाघोली येथे महिलेसोबत शरीर संबंध ठेवले.
आरोपीच्या त्रासाला वैतागून महिलेने मंगळवारी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार (PSI Pawar) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- चेष्टा मस्करीत गुदद्वाराला पाईप लावून गुदद्वारातून शरीरात भरली हवा, अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू; हडपसर परिसरातील घटना
- धक्कादायक! नाना पेठेत तरुणीला भररस्त्यात मारहाण
- पुण्यातील वाकडा पुल येथील खुनाच्या प्रयत्नातील चार आरोपींची निर्दोष मुक्तता
- Pune Crime News | रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणारे सायबर पोलिसांच्या ताब्यात
- पुण्यातील जनवाडी परिसरात गुंडांची दहशत, तलवारी उगारून तीन दुकानांची तोडफोड; दोघांना अटक