Pune Crime News | धक्कादायक! नाना पेठेत तरुणीला भररस्त्यात मारहाण
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणीला रस्त्यात अडवून तिला हाताने मारहाण करुन धमकी (Threat) दिल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नाना पेठेतील होप हॉस्पिटलसमोर (Hope Hospital) 23 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा च्या सुमारास घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत काशेवाडी भवानी पेठ (Bhawani Peth) येथे राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) मंगळवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रशांत संजय कांबळे Prashant Sanjay Kamble (वय-20 रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354अ, 354b ड, 341, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपीने तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तिने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.
याचा राग आरोपीच्या मनात होता. पीडित तरुणी नाना पेठेतील (Nana Peth) हॉप हॉस्पिटल समोरून जात
असताना आरोपीने तिला आडवले. लग्नास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने तरुणीचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग (Molestation) केला. तरुणीला कॅम्प चौकात चलण्यास सांगितले असता तिने नकार दिला. यामुळे चिडलेल्या प्रशांत कांबळे याने तरुणीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच तु माझी झाली नाही तर कोणाची होवू देणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यादव (PSI Yadav) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- पुण्यातील वाकडा पुल येथील खुनाच्या प्रयत्नातील चार आरोपींची निर्दोष मुक्तता
- Pune Crime News | रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणारे सायबर पोलिसांच्या ताब्यात
- पुण्यातील जनवाडी परिसरात गुंडांची दहशत, तलवारी उगारून तीन दुकानांची तोडफोड; दोघांना अटक
- लग्नासाठी दबाव टाकून अल्पवयीन मुलीचा मानसिक छळ, तरुणावर गुन्हा; हडपसर परिसरातील घटना
- एजंट कडून फायनान्स कंपनीला 25 लाखांचा गंडा, शिवाजीनगर परिसरातील घटना