Pune Crime News | पुण्यातील वाकडा पुल येथील खुनाच्या प्रयत्नातील चार आरोपींची निर्दोष मुक्तता

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | ट्रक, पिकअप व स्विफ्ट कार मध्ये अपघात झाल्यानंतर वाद निर्माण होऊन आरोपींनी पिकअप वाहन चालकाला मारहाण केली होती. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या एकावर जीव घेणा हल्ला (Attack) केल्याची घटना 6 जुलै 2018 रोजी वाकडा पुलाजवळ घडली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor police station) आयपीसी ३०७, ३२६, ३२५, ३२४, ३२३, ५०४, ४२७, १४३, १४७, १४८, १४९ सह मुंबई पोलीस कायद्यांतर्गत (Mumbai Police Act) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी आकाश चौधरीसह इतर तीन आरोपींची अतिरिक्त सत्र न्यायाधीश (Additional Sessions Judge) डि.पी. रागीट (D. P. Ragit) यांनी गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. (Pune Crime News)

6 जुलै 2018 रोजी वाकडा पुलाजवळ ट्रक, पिकअप व स्विफ्ट कार यांच्यात अपघात जाला होता. यानंतर वाद निर्माण होऊन आरोपींनी पिकअप वाहन चालकास बेदम मारहाण केली. त्यावेळी ट्रक मालक व फिर्यादी शशिकांत खेडकर (Shashikant Khedkar) हे आले. त्यांनी आरोपींना मारहाण करु नका असे सांगितले असता आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. खेडकर यांना मारहाण करुन धारदार हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले होते. (Pune Crime News)

आरोपींविरोधात 2019 न्यायालयात आरोपपत्र (Charge Sheet) दाखल करण्यात आले. गेल्या सहा वर्षापासून हा खटला सुरु होती. आरोपींपैकी आकाश विनायक चौधरी याच्याकडून अ‍ॅड. सिद्धांत मालेगावकर (Adv. Siddhant Malegaonkar) यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना सांगितले, तक्रारदाराचा पुरावा विसंगत, विरोधाभासी असू विश्वासार्ह नाही. तसेच आकाश चौधरी याचे कपडे सात दिवसानंतर जप्त करण्यात आले आहे. आरोपीच्या रक्ताचे डी.एन.ए प्रोफाइलिंग करण्यात आले नाही. आरोपी आकाश चौधरी आणि इतर आरोपींची उंची, चेहरा, वजन आणि शरीराच्या पोत यात साम्य नाही. तसेच T.I. परेड अहवाल सिद्ध करण्यात फिर्यादी अयशस्वी ठरले आहेत. कथित गुन्ह्यात आरोपी आकाश चौधरी याची भूमिका स्पष्ट करण्यात फिर्यादी अपयशी ठरले आहेत.

तक्रारदार पक्षाकडून 14 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र,
एवढ्या मोठ्या खटल्यात सरकार पक्ष कोणत्याही
कलमांतर्गत गुन्हा सिद्ध करु शकले नाहीत.
आरोपींच्या विरोधात सादर केलेले पुरावे आणि साक्षीदार हे सबळ पुरावे नव्हते.
ते विश्वासपात्र नसल्याने आरोपींना संशयाचा आणि सबळ पुरावे नसल्याचा फायदा देत निकाल देण्यात आला. आरोपींच्या विरोधात कुठलेच प्रकरण आक्षेपार्ह नाही त्यामुळे त्यांना संशयाचा फायदा देणे क्रमप्राप्त आहे, असे न्यायालयाने सांगितले.

सहा वर्षे चाललेल्या खटल्यात अ‍ॅड. मालेगावकर यांचा युक्तीवाद महत्त्वाचा ठरला असून न्यायालयाने आरोपी
आकाश चौधरी याची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी आकाश चौधरी याच्या वतीने मालेगावकर अँड असोसिएट्स
(Malegaonkar & Associates) तर्फे अ‍ॅड. सिद्धांत मालेगावकर यांनी कामकाज पाहिले. तसेच अ‍ॅड. प्रमोद धुळे,
अ‍ॅड. वैष्णवी पवार, अ‍ॅड. कुणाल पगार, अ‍ॅड. प्रेरणा बावीस्कर, अ‍ॅड. श्रद्धा जाधव, अ‍ॅड. शुभंकर मालेगावकर,
अ‍ॅड. कुणाल सोनवणी व अमोल घावटे यांनी कामकाज पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.