Pune Crime News | पुणे : वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये तिघांकडून हवेत गोळीबार

0

पुणे : – Pune Crime News | पुण्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये गोळीबारीच्या घटना घडत आहेत (Firing In Pune). मंगळवारी (दि.7) वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये (Firing In Ramnagar Warje Malwadi) बारामती लोकसभा निवडणुकीचे (Baramati Lok Sabha) मतदान संपताच तीन अज्ञात व्यक्तींनी रात्री अकराच्या सुमारास हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. आरोपी दुचाकीवरुन रामनगर परिसरात आले होते. ज्या ठिकाणी गोळीबार झाला, त्या ठिकाणापासून मतदान केंद्र लांब असल्याने याचा मतदान प्रक्रियेशी काहीही संबंध नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ही घटना भक्ती शक्ती चौकात घडली.

मंगळवारी बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान होते. उशीरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु होती. वारजे माळवाडी या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला. त्याचा मतदानाशी संबंध असल्याची चर्चा परिसरात सुरु होती. मात्र ज्या ठिकाणी गोळीबार झाला, त्या ठिकाणापासून मतदान केंद्र लांब होते. त्यामुळे या गोळीबाराचा मतदान प्रक्रेशी काहीही संबंध नसल्याचे दिसून आले.

दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी हवेत तीन फायरिंग केले. त्यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. हा गोळीबार झाला त्यावेळी परिसरातील मतदानाची प्रक्रिया झालेली होती, असे सांगण्यात आले. त्यामुळे या गोळीबाराची मतदान प्रक्रियेशी काहीही संबंध नसल्याचे बोलले जात आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी मुंबई-बेंगळुरु बाह्यवळण मार्गाने दुचाकीवरुन कात्रजच्या (Katraj) दिशेने पसार झाले. पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याचे वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे (Sr PI Manoj Shedge) यांनी सांगितले.

रामनगर परिसरात गोळीबार झाल्याची माहिती पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला (Pune Police Control Room) रात्री पावणे अकराच्या सुमारास मिळाली. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस आणि गुन्हे शाखेतील पथकांनी (Pune Crime Branch) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मात्र, हा गोळीबार का करण्यात आला याची माहिती अद्याप पुढे आली नाही. पोलिस याचा तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.