Pune Crime News | एजंट कडून फायनान्स कंपनीला 25 लाखांचा गंडा, शिवाजीनगर परिसरातील घटना
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | कर्ज देण्याच्या बहाण्याने अनेकांची आर्थिक फसवणूक (Fraud) केली जात आहे. अशा घटना पुणे शहरामध्ये घडत असताना एका एजंटने फायनान्स कंपनीची (Finance Company) 24 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मे 2022 ते आजपर्यंत शिवाजीनगर येथील इंक्रेड फायनान्स सर्व्हिसेस लि. (InCred Financial Services Limited) येथे घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत अकबर दावल व्हनवाड Akbar Dawal Vanwad (वय-38 रा. मातोश्री बिल्डिंग, शेवाळवाडी, हडपसर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अमोल अशोक कोळी Amol Ashok Koli (रा. अयोध्या पार्क, देशपांडे राम मंदिराजवळ, धायरी) याच्यावर आयपीसी 420, 409, 418, 471, 474 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची शिवाजीनगर येथील प्राईड हॉटेलच्या (Pride Hotel) मागे
इंक्रेड फायनान्स सर्व्हिसेस लि. नावाची कंपनी आहे. कंपनीमार्फत ग्राहकांना मागणी केल्याप्रमाणे कर्ज दिले जाते.
आरोपी अमोल कोळी हा फिर्यादी यांच्या फायनान्स कंपनीत एजंट म्हणून काम करत आहे. त्याने कंपनीच्या नावाचा वापर करुन तसेच कंपनीच्या नावाचे खोटे बनावट दस्तऐवज तयार केले. याद्वारे कोळी याने कंपनीची व ग्राहकांची सुमारे 24 लाख 65 हजार 865 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे (PSI Shinde) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- ‘आमच्याकडून जागा घ्या अन् आम्हालाच भाड्याने द्या’, जागेच्या किमतीच्या 10 टक्के प्रमाणे भाडे देण्याचे आमिष दाखवून कोटीची फसवणूक
- लाजिरवाणी बाब! महाराष्ट्रात वर्षभरात २२ हजार ७४६ आत्महत्या, NCRB चा रिपोर्ट जाहीर
- पुतण्याकडून पाऊण कोटींची फसवणूक, पुण्यातील प्रकार
- दुसर्या मुलासोबत प्रेयसीची जवळीक वाढल्याच्या संशयातून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
- Lalit Patil Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील निलंबित डॉ. प्रवीण देवकाते याला अटक
- ऐतिहासिक भिडे वाडा सरकारजमा, सोमवारी रात्री 11 वाजता कडेकोट बंदोबस्तात इमारत घेतली ताब्यात