Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | सासरच्या लोकांकडून आणि पतीकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाल कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केली (Suicide Case). याप्रकरणी पती, सासु-सासरे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथील भंडारा दर्शन कॉलनीत (Bhandara Darshan Colony) सोमवारी (दि.13) घडला आहे.

प्रियंका विराज अवगडे (वय-23) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत मयत मुलीच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी पती विराज मोहन अवघडे (वय- 24 रा. भंडारा दर्शन कॉलनी, तळेगाव दाभाडे) याला अटक केली आहे. तर विराज याचे वडील मोहन अवघडे व आई यांच्यावर आयपीसी 306, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी प्रियंका हिचा विवाह 2020 साली विराज याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर विराज याने प्रियंकाचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. मुलगा सुनेचा छळ करत असताना सासू-सासरे यांनी तीला कोणतीही मदत न करता मुलाच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले. पतीच्या व सासरच्या त्रासाला कंटाळून प्रियंकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. तळेगाव पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खामगळ करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.