Pune Crime News | पुणे : कंपनी चालकाने केला कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीत अपहार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | कामगारांच्या पगारातून भविष्यनिर्वाह निधी (Provident Fund) कपात करण्यात आली होती. मात्र, कपात केलेली रक्कम पीएफ खात्यांमध्ये न भरता कंपनी मालकाने स्वतःच्या फायद्यासाठी ती रक्कम वापरली. हा प्रकार कोंढवा बुद्रुक येथील आरएनडी ऑटोमेशन प्रा. लि. कंपनीत (RND Automation Pvt. Ltd.) मार्च 2019 ते जुलै 2022 या कालावधीत घडला आहे. कंपनी मालकाने कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेमध्ये 6 लाख 25 हजारांचा अपहार केला आहे. (Pune Crime News)

याबाबत राहुल एकनाथ कोकाटे (वय 51, रा. क्रीमसन क्रिस्ट सोसायटी, हडपसर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कंपनीचे मालक निखिल लॉरेन्स दुबॉईस Nikhil Lawrence Dubois (वय 40, रा. बधेनगर, सिल्वर हॉलच्या मागे, कोंढवा बुद्रुक) यांच्या विरोधात आयपीसी 406, 409 सह कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना कलम 14 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखिल दुबॉईस यांची येवलेवाडी रोडवर आरएनडी ऑटोमेशन प्रायव्हेट लि. कंपनी आहे. या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या मासिक पगारातून भविष्यनिर्वाह निधी कपात करण्यात आली.

मार्च 2019 ते जुलै 2022 या कालावधीत कामगारांच्या वेतनातून एकूण 18 लाख 01 हजार 528 रुपये कपात
करण्यात आले. त्यापैकी 11 लाख 75 हजार 812 एवढी रक्कम भविष्यनिर्वाह निधी खात्यात जमा केली.
उर्वरीत 6 लाख 25 हजार 716 रुपयांचा अपहार केला. निखील दुबॉईस यांच्याविरुद्ध कोकाटे यांनी न्यायालयात फौजदारी
दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशाने दुबॉईस यांच्याविरुद्ध अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुदळे (API Kudale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.