Pune Crime News | जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक, सिंहगड रोड परिसरातील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने सुरुवातीला काही रक्कम दिल्यानंतर तरुणीची साडे सहा लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार 2 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान फिर्यादी तरुणीच्या राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन 93072XXXXXX मोबाईल धराक, टेलीग्राम धारक व वेगवेगळ्या बँक खातेदारांवर आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्याशी व्हॉट्सअॅप व टेलीग्राम अॅपच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांना ऑनलाईन टास्क (Online Tasks) दिला. टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने सुरुवातील काही रक्कम तरुणीच्या बँक खात्यात जमा करुन विश्वास संपादन केला. यानंतर मोठ्या रक्कमेचे आमिष दाखवू फिर्यादी यांना वेळोवेळी
6 लाख 55 हजार 800 रुपये विविध बँक खात्यात पाठवण्यास सांगितले. फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून पैसे पाठवले.
त्यानंतर आरोपींनी कोणत्याही प्रकारचा परतावा तसेच घेतलेले पैसे परत न करता फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Sr PI Abhay Mahajan) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.