Pune Crime News | पुणे : ‘तु मोठा भाई झाला का?’ म्हणत तरुणाचे दात पाडले, चार जणांवर FIR
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | तु मोठा भाई झाला का? असे म्हणत एका तरुणाला बेदम मारहाण (Beating) करुन त्याचे दात पाडून गंभीर जखमी केल्याची घटना वाघोली परिसरात घडली आहे. याप्रकरणी चार जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 20 नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडला. (Pune Crime News)
याबाबत ज्योती किरण पवार (वय-33 रा. बिडी कामगार वसाहत, येरवडा) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन कुणाल जाधव उर्फ राजा, ईस्माईल शेरीकर, राहुल घाडगे उर्फ आर डी जी, सुदेश गायकवाड यांच्यावर आयपीसी 325, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा ऋतिक पवार हा त्याचा मित्र अंश पुंडे व इतर मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आरोपींनी त्याठिकाणी येऊन फिर्यादी यांच्या मुलाला तु अंश पुंडे याच्यासोबत का राहतो. तुला माज आला का? का तु खुप मोठा भाई झाला? असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच ओठावर मारुन त्याचे समोरील दात पाडून गंभीर जखमी केले.
यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ व दमदाटी करुन पळून गेले.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करुन विनयभंग, दत्तवाडी परिसरातील घटना
- Maharashtra Kesari Sikandar Shaikh | ऑलंम्पिकमध्ये कुस्तीत सुवर्ण पदक जिकण्यांचे स्वप्न – सिकंदर शेख
- लोणी काळभोर : महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी, भररस्त्यात मारहाण करुन विनयभंग
- कर्जाच्या परतफेडीच्या तगाद्याला कंटाळून एकाची आत्महत्या; बँक मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल