Pune Crime News | बाणेर रोडवरील महाबळेश्वर हॉटेलजवळ गोळीबार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | कामावरुन काढून टाकले, या गैरसमजातून दोघांनी तरुणावर गोळीबार (Firing In Pune) करण्याची घटना बाणेर रोडवरील महाबळेश्वर हॉटेलजवळ घडली. या घटनेत एक तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. (Pune Crime News)

आकाश बाणेकर (वय २८, रा. लवळे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत निलेश दत्तात्रय पिंपळकर (वय ३८, रा. गुजरात कॉलनी,कोथरुड) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८४९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अदित्य दिपक रणावरे (Aditya Deepak Ranavare) व सागर लक्ष्मण बनसोडे (Sagar Laxman Bansode) यांना अटक केली आहे. हा प्रकार बाणेर रोडवरील महाबळेश्वर हॉटेलजवळ रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश पिंपळकर आणि रोहित ननावरे हे दोघे एका मोटार कंपनीत कामाला आहेत. रोहित याला कामावरुन काढून टाकले, या गैरसमजुतीतून त्याने फिर्यादी यांना महाबळेश्वर हॉटेलजवळ बोलावून घेतले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर तेथील मुलांनी रोहित ननावरे याला घरी नेऊन सोडले. फिर्यादी, आकाश बाणेकर हे तेथे बोलत थांबले असताना आदित्य रणावरे, सागर बनसोडे यांच्याशी त्यांचा वाद झाला. तेव्हा आदित्य याने पिस्तुलातून गोळीबार केला.
त्यातील गोळी आकाश बाणेकर याच्या उजव्या पायांच्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली़ चतु:श्रृंगी पोलिसांनी (Pune Police)
दोघांना अटक केली असून त्यांच्याकडील गावठी पिस्तुल (Pistol), २ जिवंत राऊंड जप्त केले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.