Pune Crime News | पुण्यात निवृत्त कर्नलची फसवणूक, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यात निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला (Retired Army Colonel) अज्ञात क्रमांकावरून एक व्हिडिओ कॉल (Video Call) आला आणि काही सेकंदासाठी तो कॉल उचलल्यामुळे ही व्यक्ती मोठ्या संकटात सापडली. सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime) त्यांच्याकडून ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२३ यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने तब्बल ३ लाख ७४ हजार रुपये उकळले. (Cheating Fraud Case) यानंतर सदर व्यक्तीने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय फिर्यादी हे लष्करातून निवृत्त झाले असून ते पुण्यातील वाघोलीत राहतात. एक दिवस त्यांना अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. तो कॉल उचलताच पलिकडे एक तरुणी कपडे काढताना दिसली.
फिर्यादी यांनी व्हिडीओ कॉल लगेच बंद केला. हा प्रकार सुरू असताना सायबर गुन्हेगारांनी तो व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला आणि नंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे मागण्यास सुरुवात केली. (Pune Crime News)
फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने सायबर गुन्हेगारांनी वेगळ्या क्रमांकावरून पुन्हा फिर्यादीला फोन करून दिल्ली पोलीस बोलत असल्याचे सांगितले.
तुमचा व्हिडीओ आक्षेपार्ह असून सोशल मीडियावर व्हायरल झाला तर खूप बदनामी होईल
त्यामुळे तत्काळ ते व्हिडिओ डिलीट करून घ्या असे पलिकडील व्यक्ती म्हणाला.
यानंतर फिर्यादी यांनी व्हिडीओ डिलिट करण्यासाठी वेळोवेळी ३ लाख ७४ हजार २३२ रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे (PI Seema Dhakne) करत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Anjali Damania | मोठी बातमी : अंजली दमानिया भुजबळांविरूद्ध करणार होत्या मोठा खुलासा, तत्पूर्वीच पोलिसांनी घेतले ताब्यात
- FIR On 3 Leaders Of Shivsena UBT | मोठी बातमी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंसह ३ नेत्यांविरोधात गुन्हा दाखल, काय आहे कारण?
- Pune Crime News | शेजारच्याशी होणार्या भांडणातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, धनकवडीमधील घटना
- ACB Trap Case News | 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात