ACB Trap Case News | 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

0

सांगली : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – ACB Trap Case News | 45 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 40 हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी सांगली जिल्हयातील केडगांव प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार (Nayab Tahsildar) सुनील जोतीराम चव्हाण Sunil Jyotiram Chavan (50) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या Anti Corruption Bureau (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (ACB Trap Case News)

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी मंजुळा मलकांना कांबळे यांना दीड गुंठे जमीन तर सीमा बाळू रायारू यांना एक गुंठा जमीन विकली होती. सदरील जमीनीस अकृषिक (एनए) आकारणी करून सनद देण्याकरिता नायब तहसीलदार सुनील जोतीराम चव्हाण यांनी दीड गुंठयासाठी 25 हजार रूपये तर एका गुंठयासाठी 20 हजार रूपये अशी एकुण 45 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 40 हजार रूपयांवर मांडवली झाली. (ACB Trap Case News)

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शनच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी शुक्रवारी (दि. 17 नोव्हेंबर 2023) रोजी करण्यात आली. दरम्यान, केडगांव येथील प्रांत कार्यालयाच्या आवारात नायब तहसीलदार सुनील जोतीराम चव्हाण याने सरकारी पंचासमक्ष 40 हजार रूपयाची लाच घेतली. त्यावेळी त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

दरम्यान, सुनील जोतीराम चव्हाण हे यापुर्वी सन 2013 मध्ये अव्वल कारकून पदावर इस्लामपूर प्रांत कार्यालयात कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्याविरूध्द 7 हजार रूपयाची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. (Sangli ACB Bribe Trap Case)

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक विजय चौधरी,
उप अधीक्षक संदीप पाटील, पोलिस निरीक्षक विनायक भिलारे,
पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलिस हवालदार ऋषिकेश बडणिकर,
रामहरी वाघमोडे, पोलिस नाईक अजित पाटील, सुदर्शन पाटील, धनंजय खाडे, अतुल मोरे,
सीमा माने, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पोपट पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | वानवडी परिसरात दहशत माजविणार्‍या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई ! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत स्थानबध्दतेच्या 58 कारवाया

Leave A Reply

Your email address will not be published.