Pune Police MCOCA Action | खंडणी मागणाऱ्या अतुल धोत्रे व त्याच्या 2 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 84 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | इंटरनेटची केबल टाकण्याचे काम करणाऱ्याकडे खंडणी (Extortion Case) मागणाऱ्या अतुल धोत्रे व त्याच्या इतर 2 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यापासून 84 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का (Pune Police MCOCA Action) कायद्यान्वये कारवाई केली आहे.

फिर्यादी हे इंटरनेटची केबल टाकण्याचे काम करतात. फिर्यादी यांचे कामगार इंटरनेटची एरीयल फायबर टाकण्याचे काम करत होते. त्यावेळी निखील कांबळे व अतुल धोत्रे हे काम सुरु असलेल्या ठिकाणी आले. त्यांनी जबरदस्तीने काम थांबवून तुम्ही आमची परवानगी घेतली का असे म्हणत वडारवाडी, पांडवनगर भागात आमच्या परवानगी शिवाय कोणी केबलचे काम करत नसल्याचे सांगितले. तसेच तुम्हाला जर काम करायचे असेल तर दर महिना 10 हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणत खंडणीची मागणी केली. फिर्यादी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी 25 ऑक्टोबर रोजी दुपारी दिप बंगला चौकातील हॉटेल रेड पान्डा येथे सापळा रचून फिर्य़ादी यांच्याकडून 4 हजार रुपयांची खंडणी घेताना आरोपींना रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी टोळी प्रमुख अतुल अनिल धोत्रे Atul Anil Dhotre (वय-21 रा. जुनी वडारवाडी, कुसाळकर बिल्डिंग, पुणे), निखील शिवा कांबळे Nikhil Shiva Kamble (वय-19 रा. पांडवनगर, पुणे), तेजस शिवाजी विटकर Tejas Shivaji Witkar (वय-21 रा. वडारवाडी, पुणे ) यांच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) आयपीसी 384, 385, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. (Pune Police MCOCA Action)

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Sr PI Balaji Pandhare) यांनी परिमंडळ- 4 पोलीस उपायुक्त शशीकांत बोराटे (DCP Shashikanth Borate) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Aarti Bansode) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार पाटील, परिमंडळ- 4 पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे,
खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण (PI Ankush Chintaman),
पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर (PI Jagannath Jankar),
तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण (API Anil Kekan)
निगराण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड (API Ratnadeep Gaikwad),
पोलीस अमंलदार अमित गद्रे व सुहास पवार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.