Sharad Pawar On PM Narendra Modi | नेहरू , इंदिरा गांधीसह सर्व पंतप्रधानांच्या सभा ऐकल्या, मात्र पंतप्रधान मोदींची भाषा लाजिरवाणी : शरद पवार

0

चाकण : Sharad Pawar On PM Narendra Modi | जवाहर नेहरू इंदिरा गांधीसह जे जे पंतप्रधान झाले. त्यांच्या सभा आम्ही ऐकल्या आहेत. मात्र पंतप्रधान मोदी लाजिरवाणी भाषा करत आहेत, असा घणाघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रचारार्थ आयोजित चाकण येथील सभेत (Sharad Pawar Chakan Sabha) ते बोलत होते. (Shirur Lok Sabha)

शरद पवार म्हणाले, हा लोकशाही देश आहे. जगातील श्रेष्ठ लोकशाही भारतात आहे. लोकशाहीची आस्था जगाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी लोकशाहीवर संकट आणू पाहत आहेत. यासाठी व्यवस्थेला बेधडक आव्हान देणारे अमोल कोल्हे संसदेत हवेतच, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, या निवडणुकीकडे जगाचे लक्ष आहे. लोकशाहीवर मोदी आणि त्यांचे सहकारी संकट आणत आहेत. त्यांना घटना आणि संविधान बदलायचे आहे. टीका व्हायला लागल्याने मोदी सांगू लागलेत आम्ही घटनेला हात लावणार नाही. घटना बदल्याण्यासाठी मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन भाजप नेते करीत आहेत.

४०० खासदार निवडून द्या, याचा अर्थ असा आहे कि तुमच्या आमच्या अधिकारावर गदा आणण्याचा डाव त्यांनी तयार केला आहे. त्यापासून आपण सावध भूमिका घेतली नाही तर हिंदुस्थानची लोकशाही धोक्यात जाऊ शकते, असे पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, मोदी राज्यात येतात आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर मोदी टीका करतात मात्र आमच्या अंगाला टीकेमुळे भोके पडणार नाहीत. ते या ठिकाणी नाही त्या गोष्टी सांगतात.

पवार म्हणाले, नव्या पिढीचा नेता राहुल गांधी पायी सर्व देशात फिरला. लोकांशी संवाद साधला, त्यांची दुःख समजून घेतली; त्यांची मोदी टिंगल करत आहेत. पंडित नेहरू, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांनी देशासाठी त्याग केला मात्र त्याची नोंद घेणे तर सोडा, त्यांच्याबाबत वेडेवाकडे बोलत आहेत.

शेतमालाला रास्त किंमत मिळालीच पाहिजे, प्रत्येकाला काम मिळाले पाहिजे, स्रियांचा सन्मान झाला पाहिजे, त्यासाठी संसदेत कोल्हे यांच्या सारखे नेतृत्व जायला हवे, असे पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.