Pune Crime Accident News | पुणे: जांभूळवाडी दरी पुलाजवळ चार वाहनांचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर तिघे जखमी

Accident Near Dari Pool Jambhulwadi

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime Accident News | जांभूळवाडी दरी पुलाजवळ 4 वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली (Dari Pool, Jambhulwadi Road, Katraj, Maharashtra) असून त्यामध्ये मोठया कंटेनरची लक्झरी बस, टेम्पो आणि कारला धडक बसली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर तिघे जखमी झाले आहेत. (Pune Crime Accident News)

शाहनवाज झुल्फिकार मुंन्सी (30) आणि विशाल कुमार नाविक (22) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याची नावे आहेत. पुजा बागल, जियालाल निसार आणि सुभाष इंदलकर हे जखमी झाले आहेत.

नवले ब्रिजच्या आधी आणि नव्या कात्रज बोगद्याच्या पुढे असलेल्या जांभूळवाडी दरी पुलावर बेंगळुरूकडून एक भरधाव कंटेनर येत होता. तीव्र उतार असल्याने चालकास कंटेनरवरील नियंत्रण ठेवता आले नाही.
त्यामुळे कंटेनरची धडक लक्झरी बस, टेम्पा आणि कारला बसली. त्यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले.
त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर इतर तिघे जखमी झाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update