Pune Police MPDA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून एमपीडीएची कारवाई

Pune Police MPDA Action

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police MPDA Action | खडक पोलीस ठाण्याच्या (Khadak Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार नजीर सलीम शेख Nazeer Salim Shaikh (वय- 29 रा. हनुमान मंदिराजवळ, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए (Pune Police MPDA Action) कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.

आरोपी नजीर शेख याच्यावर खडक पोलीस ठाण्यात 2019 पासून जीवे मारण्याचा प्रयत्न, मारामारी, घातक हत्यार बाळगणे, जबरी चोरी, धमकी देणे, सामान्य नागरिकांना विनाकारण मारहाण, व्यापारी व बिल्डर यांना खंडणी मागणे, दहशत निर्माण करणे यासारखे 5 गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवाईंना आळा घालण्यासाठी 2023 मध्ये त्याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपार केल्यानंतर देखील त्याने गुन्हे केले आहेत.

खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने यांनी आरोपी नजीर शेख याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त यांच्याकडे सादर केला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपीला एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध (Pune Police MPDA Action) करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक
(IPS Sandeep Karnik ), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीणकुमार पाटील
(IPS Praveen Kumar Patil), पोलीस उपायुक्त संदिप गिल्ल (IPS Sandeep Singh Gill),
सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने,
पोलीस निरीक्षक गुन्हे संपतराव राऊत, सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस उप निरीक्षक अतुल बनकर,
पोलीस अंमलदार नितीन जाधव, महेश पवार, स्वप्नील बांदल यांच्या पथकाने प्रस्ताव तयार केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा