Pune Police MCOCA Action | पुण्यातील सनी जाधव व त्याच्या 2 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 82 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

IPS Ritesh Kumar

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | पुण्यातील बालाजीनगर परिसरात कोयत्याने मारहाण करुन दहशत पसरवणाऱ्या सनी जाधव व त्याच्या इतर 2 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यापासून 82 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का (Pune Police MCOCA Action) कायद्यान्वये कारवाई केली आहे.

भांडण मिटवण्यसााठी बोलावले असता मारहाण करुन एकावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत हातातील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत पसरवल्याची घटना 25 ऑक्टोबर रोजी बालाजीनगर येथील के.के. मार्केट येथे घडली होती. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) आयपीसी 307,323,504,506,34, सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दाखल गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी सलमान उर्फ सल्या हमीद शेख Salman alias Salya Hameed Sheikh (वय-23 रा. बालाजीनगर, पुणे), वैभव उर्फ बबलु उर्फ मनोज विवेक कोठारी Vaibhav alias Bablu alias Manoj Vivek Kothari (वय-27 रा. काशीनाथ पाटील नगर, धनकवडी) यांना अटक केली आहे. तर टोळी प्रमुख सनी शंकर जाधव Sunny Shankar Jadhav (वय-21 रा. चैत्रबन वसाहत, अप्पर बिबवेवाडी, पुणे) हा फरार आहे.

आरोपी सनी जाधव व इतर साथीदारांनी संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली. टोळीचे धनकवडी परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आरोपींनी सहकारनगर व बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या (Bibvewadi Police Station) हद्दीत खुनाचा प्रयत्न, दरोडा, मनुष्यवधाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, लोकांमध्ये हल्ले करणे, घातक शस्त्र बाळगणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Pune Police MCOCA Action)

सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम
3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे (Sr PI Surendra Malale)
यांनी परिमंडळ- 2 पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त
पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Praveen Kumar Patil) यांना सादर केला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, परिमंडळ- 2 पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील,
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप देशमाने, पोलीस अंमलदार संजय गायकवाड,
मंगेश खेडकर, पुजा तिडके, भाऊसाहेब आहेर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा