Pune News | ‘भाऊबीज’ सणानिमित्त पुण्यातील मार्केट यार्ड बंद राहणार, ‘शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणू नये’
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune News | मुख्य व उपबाजार आवारास वरिष्ठ कार्य़ालय, शासन मान्यतेने जाहिर करण्यात आलेल्या सुट्ट्यांपैकी भाऊबीज सणानिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Pune News)
भाऊबीजनिमित्त मार्केट यार्ड (Market Yard) येत्या बुधवारी (दि.15) बंद ठेवण्यात येणार आहे, असे पुणे
कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Pune Krushi utpanna bazar samiti) सभापती यांनी जाहीर केले आहे.
बुधवारी मार्केट यार्डातील मुख्य बाजार, मोशी उपबाजार बंद राहणार आहे. (Pune News)
बुधवारी भाऊबीजनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मार्केट यार्ड येथील फळे-भाजीपाला विभाग, केळी बाजार,
पान बाजार बंद राहणार आहेत. तसेच मुख्य बाजार आवारातील फुलांचा बाजार भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवार
दि. 16 नोव्हेंबर रोजी बंद राहणार आहे. त्यामुळे यादिवशी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा