Pune Crime News | धक्कादायक! तरुणाला कपडे काढून नाचायला लावलं, न्यूड व्हिडिओ केला व्हायरल; येरवडा येथील प्रकार

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | तरुणाला कपडे काढून डान्स करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाहीतर नाचतानाचा नग्न व्हिडिओ (Nude Video) काढून तो गावाकडील व्हॉट्सअॅप ग्रुपवर (Whatsapp Group) व्हायरल करुन तरुणाची बदनामी केली. तसेच त्याच्याकडून जबरदस्तीने 60 हजार रुपये उकळले. हा धक्कादायक प्रकार येरवडा येथे 13 जुलै 2023 रोजी रात्री अकरा वाजता घडला आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
याबाबत 33 वर्षाच्या तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) गुरुवारी (दि.9) फिर्याद दिली आहे. त्यावरुन सोमनाथ कोंडीबा राजभोज, चंद्रकांत बबन लांडगे, संजय आत्माराम सुतार, सुभाष हनुमंतराव भोसले (सध्या रा. येरवडा मुळ रा. तिसगाव, प्रवरा नगर) यांच्यावर आयपीसी 392, 427, 500, 506, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच गावचे आहेत.
घटनेच्या दिवशी आरोपी सोमनाथ राजभोज याने फिर्यादी यांना तुझा भाऊ आला आहे असे सांगून फ्लॅटवर बोलावून घेतले.
फिर्यादी हे आरोपीच्या फ्लॅटवर गेले असता आरोपींनी त्याला कपडे काढण्यास सांगितले.
त्यानंतर त्याला नाचायला लावून त्याचा नग्न व्हिडिओ काढला.
तसेच फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने 60 हजार रुपये काढून घेत मोबाईल जाळला.
आरोपींनी शुटींग केलेला व्हिडिओ गावाकडील व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवून फिर्यादी यांची बदनामी केली.
हा प्रकार लक्षात येताच फिर्यादी यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Sr PI Vinayak Gaikwad) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime News | खिशातून पैसे काढल्याच्या रागातून तरुणाचा खून, खराडी मधील घटना; सराईत गुन्हेगाराला अटक
- ACB Demand Trap News | 1 लाखाची लाच मागणाऱ्या सहकार विभागातील क्लास वन अधिकार्यावर अॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल
- ACB Demand Trap News | 1 लाखाची लाच मागणाऱ्या सहकार विभागातील क्लास वन अधिकार्यावर अॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल