Pune Crime News | पुणे : अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमावर FIR
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Minor Girl Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील कोरेगाव परिसरात 18 जुलै 2023 रोजी घडली आहे. याप्रकरणी एका 19 वर्षाच्या तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
याबाबत हडपसर येथे राहणाऱ्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिसांनी (Pune Police) हा गुन्हा कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) वर्ग केला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रतिक मुंडकर (वय-19 पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 376/2/एन, पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतिक मुंडकर पीडित मुलीच्या वर्गात शिकतो. त्याने मुलीला कोरेगाव पार्क परिसरातील एका बिल्डिंगमध्ये नेले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पीडित मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी प्रतिक विरोधात तक्रार दाखल केली. ही घटना कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने कोंढवा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन कोरेगाव पार्क पोलिसांकडे वर्ग केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
- पुण्यातील वानवडी परिसरातील बीटी कवडे रोडवर एकावर गोळीबार, प्रचंड खळबळ
- Pune PMC Fort Competition | पुणे महानगरपालिकेची किल्ले स्पर्धा गुरुवारपासून, विजेत्यांना रोख बक्षिसे
- Maharashtra Crime News | धक्कादायक! जेलचे गज कापून संगमनेरच्या कारागृहातून चार कैद्यांचे ‘फिल्मी स्टाईल’नं पलायन
- मारहाण करून महिलेचा विनयभंग, विमानतळ परिसरातील घटना