Pune Crime Firing News | पुण्यातील वानवडी परिसरातील बीटी कवडे रोडवर एकावर गोळीबार, प्रचंड खळबळ

Firing In Pune Wanwadi Area

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime Firing News | वानवडी पोलिस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीतील बीटी कवडे रोडवर गोळीबार झाल्याची घटना काही मिनीटांपुर्वी झाली आली (Firing In Pune). याबाबतची खबर पोलिसांनी मिळाली असून वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी (Pune Police Crime Branch) घटनास्थळी रवाना झाले आहेत. (Pune Crime Firing News)

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बीटी कवडे रोडवरून जाणार्‍या दुचाकीस्वारावर गोळीबार झाला आहे. त्याच्या पायावर गोळया झाडण्यात आल्या आहेत. नेमक्या किती गोळया झाडण्यात आल्या याबाबत माहिती समोर आलेली नाही मात्र वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्यासह वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. (Pune Crime Firing News)

वानवडीतील बीटी कवडे रोडवर गोळीबार झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

प्रतिक मदनलाल ओसवाल (35) यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.