Pune Crime News | मारहाण करून महिलेचा विनयभंग, विमानतळ परिसरातील घटना
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पानटपरी बंद करत असताना महिलेला मारहाण (Beating) करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना घडली आहे. ही घटना 1 नोव्हेंबर रोजी मंत्री आय.टी. पार्क गेटच्या जवळ दुपारी एक ते दीड दरम्यान घडली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
याबाबत येरवडा गावठाण येथे राहणाऱ्या 25 वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर म्हस्के (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 354, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांची मंत्री आय.टी. पार्क गेटजवळ पानटपरी आहे.
घटनेच्या दिवशी दुपारी एकच्या सुमारास त्या पानटपरी बंद करत असताना आरोपी त्याठिकाणी आला.
त्याने महिलेला शिवीगाळ करुन कानशीलात मारली. तसेच हात पिरगळुन पानटपरी चालु देणार नाही असी धमकी दिली.
हा वाद सुरु असताना त्याठिकाणी लोक जमले. आरोपीने फिर्यादी महिलेच्या अंगावरील कपडे फाडण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.