Pune Crime News | पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने साडेतीन लाखांची फसवणूक, पुण्यातील टिंगरेनगरमधील प्रकार
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पार्ट टाइम नोकरी (Part Time Job) देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 3 लाख 54 हजारांची फसवणूक (Cheating Fraud Case) सायबर चोरट्याने (Cyber Crime) केली आहे. हा प्रकार 4 ऑगस्ट 2023 ते 10 ऑगस्ट 2023 या कालावधीत तक्रारदार यांच्या टिंगरेनगर येथील राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत जितेंद्र माणिकचंद गुप्ता (रा. लेन नंबर 5, टिंगरेनगर, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी टेलिग्राम आयडी धारक, वेबसाईट हॅण्डलर, मोबाईल धारकावर आयपीसी 419, 420, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सायबर चोरट्याने फिर्यादी यांना पार्ट टाइम नोकरी देण्याचे आमिष दाखवले.
त्यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये अॅड करुन ऑनलाईन टास्क (Online Tasks) पूर्ण केल्यास चांगल्या परतवा मिळेल असे सांगितले. सायबर चोरट्यांनी दिलेले टास्क फिर्यादी यांनी पूर्ण केले. त्यानंतर प्रिपेड टास्क मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांनी सायबर चोरट्यांवर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यावर 3 लाख 54 हजार रुपये पाठवले. (Pune Crime News)
पैसे पाठवल्यानंतर सायबर चोरट्यांनी कोणताही परतावा न देता आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे
लक्षत आल्यानंतर फिर्यादी यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) फिर्याद दिली.
सायबर पोलिसांनी हा गुन्हा विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर (Sr. PI Dattatraya Bhapkar) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा