नवी दिल्ली: वृत्तसंस्था – Face Packs For Oily Skin | आपल्या सर्वांच्या स्वभावाप्रमाणे चेहऱ्याची बनावट सुद्धा वेगळी वेगळी आणि युनिक आहे. आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी अनेक प्रकारचे फेस पॅक बाजारात उपलब्ध आहेत. पण कॉम्बिनेशन किंवा तेलकट चेहरा असलेल्या लोकांना अनेकदा त्वचेला सूट होणारे फेस पॅक मिळत नाहीत. त्यामूळे मार्केटमध्ये उपलब्ध असलेले फेस पॅक वापरावे लागतात पण तेलकट चेहरा असलेल्या लोकांनी आंधळेपणाने कोणतेही प्रोडक्ट्स वापरू नयेत असे तज्ञ सांगतात. कारण जवळपास सर्वच वस्तू, मग ते घरातील असो किंवा बाजारातील, आपल्याला फायद्याऐवजी दुष्परिणाम देऊ शकतात. (Face Packs For Oily Skin)
जर तुमची त्वचा देखील तेलकट असेल, तर चला काही घरगुती फेस पॅकबद्दल माहिती जाणून घेऊयात ज्याचा वापर करून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल, ते सुद्धा कोणत्याही साइड इफेक्टशिवाय (Home made face packs for oily skin) –
1. मसूर दाल फेस पॅकचे फायदे –
एक उत्तम आणि नैसर्गिक एक्सफोलिएटर, मसूर डाळ त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते ज्यामुळे त्वचा चमकते. ते घाण, जंतू देखील काढून टाकते ज्यामुळे मुरुम येत नाहीत. मसूर एक उत्कृष्ट क्लिन्झर म्हणून देखील कार्य करते आणि नियमित वापरानंतर ब्लॅकहेड्स आणि मुरुमांच्या डागांपासून चेहरा मुक्त होतो. तेलकटपणा कमी करण्यास हा पॅक उपयुक्त ठरेल. (Face Pack Benefits)
मसूर डाळ फेस पॅक बनवण्याची कृती –
1. दोन चमचे मसूर घ्या आणि मिक्सर मधून बारीक करा.
2. आता त्यात एक चमचा दही आणि गुलाबजल टाका.
3. हा पॅक नीट मिसळल्यानंतर चेहऱ्यावर लावा.
4. तेलकट त्वचेची समस्या दूर होईल आणि त्वचा अधिक मऊही होईल.
2. नीम फेस पॅकचे फायदे –
कडुलिंबाचा फेस पॅक त्वचेचा रंग उजळण्यास मदत करतो. कडुलिंबातील अँटिऑक्सिडंट्स काळे डाग आणि इतर समस्या कमी करण्यास मदत करतात. यामुळे त्वचा डागरहित होते. मुरुमांवर उपचार करते. (Face Packs For Oily Skin)
नीम फेस पॅक बनवण्याची कृती –
1. कडुलिंबाची पाने धुवून मिक्सर mdhe बारीक करा.
2. त्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला.
3. तुम्ही ते आठवड्यातून एकदा लावू शकता. कडुलिंब चेहऱ्यावर तेल कमी करण्यात मदत करते.
3. काकडीच्या फेस पॅकचे फायदे –
काकडी चेहऱ्यासाठी अतिशय गुणकारी मानली जाते. काकडीचा त्वचेवर सुखदायक आणि मॉइश्चरायझिंग प्रभाव असतो कारण त्यात जीवनसत्त्वे ए, सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात. याशिवाय, ते मेलेनिनचे उत्पादन देखील कमी करू शकते म्हणजेच स्किन गोरी आणि चमकदार बनते.
काकडीचा फेस पॅक बनवण्याची कृती –
1. प्रथम काकडी किसून घ्यावी.
2. त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि अलोवेरा जेल घाला.
3. हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर चेहऱ्याला लावा.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बर्फाच्या ट्रेमध्येही ठेवू शकता. तुम्ही क्यूब्सनेही चेहऱ्याला मसाज करू शकता. या दोन्ही पद्धतींमुळे तुमची तेलकट त्वचा दूर होईल. हा फेस पॅक आठवड्यातून ३ दिवस लावता येतो.
Web Title :- Face Packs For Oily Skin | face pack benefits oily skin face mask
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Benefits Of Mustard Oil | पुरुषांनी रोज ‘या’ 2 भागांवर लावावे मोहरीचे तेल, होतील आश्चर्यकारक फायदे