Vitamin C Deficiency | सावधान ! ‘या’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केस, दात आणि त्वचेला धोका; दृष्टी होते कमी

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Vitamin C Deficiency | आपल्या आहारातून आपल्याला अनेक पोषक घटक मिळतात. ज्यापैकी मुख्य घटक जीवनसत्वे म्हणजेच व्हिटॅमिन सुद्धा आहेत. जीवनसत्त्वे अनेक रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. अशा स्थितीत इतर जीवनसत्त्वांप्रमाणेच व्हिटॅमिन सीचा योग्य पुरवठा शरीरासाठीही खूप महत्त्वाचा असतो. व्हिटॅमिन सी हे अँटिऑक्सिडेंट आहे, जे संयोजी ऊतक सुधारते (repair connective tissue) आणि सांध्यांना (Joints) आधार देण्याचे काम करते. याचे नियमित सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. (Vitamin C Deficiency)

व्हिटॅमिन सीची कमतरता होण्याचे कारण :-

धूम्रपान मद्यपान करणे

नीट आहार न घेणे

एनोरेक्सिया

गंभीर मानसिक आजार

डायलीसिस

व्हिटॅमिन सी चे योग्य प्रमाण :-
सर्वसाधारणपणे, पुरुषांना दररोज 90 मिलीग्राम आणि महिलांना 75 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. (Vitamin C Deficiency)

व्हिटॅमिन सी कमतरता असल्याची लक्षणे :-

कोरडी त्वचा (Scaly patches and dandruff)

सांधे दुखी

गम /हिरड्या दुखणे

चयापचय मंदावणे

कोरडे आणि विभाजित केस

जखम बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो

अशक्तपणा

हिरड्यामधून रक्तस्त्राव

संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होते

अगदी किरकोळ ओरखडे आल्यावर सुद्धा रक्तस्त्राव

तोंडाचे व्रण किंवा तोंडाच्या कोपऱ्यात भेगा पडणे

रात्रीची दृष्टी कमी पडणे

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होणारे रोग आणि समस्या :-

स्कर्वी

अशक्तपणा आणि थकवा येतो (Anaemia)

दातदुखणे

नखे कमकुवत होतात

सांधेदुखीचा त्रास होतो

केस गळतात

हायपरथायरॉईडीझम (Hyperthyroidism)

त्वचा रोग (Skin diseases)

व्हिटॅमिन सी युक्त आहार :-

लिंबूवर्गीय फळे जसे संत्री, द्राक्ष, लिंबू आणि मोसंबी

ब्लॅककुरंट्स, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी सारख्या बेरी.

फणस, कलिंगड, खरबूज, किवी आणि टरबूज.

पालक, हिरवी आणि लाल मिरची, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट्स आणि बटाटे यासारख्या भाज्या.

Web Title :- Vitamin C Deficiency | vitamin c deficiency it will keeps eyes healthy vitamin c rich foods importance of vitamin c

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Face Packs For Oily Skin | वापरा ‘हे’ फेस पॅक आणि मिळवा चमकदार, ऑईल फ्री चेहरा

Foods To Not Refrigerate | तुम्ही सुद्धा फळे फ्रिजमध्ये ठेवता का? जाणून घ्या कोणती फळे फ्रिजमध्ये ठेवू नयेत

Benefits Of Mustard Oil | पुरुषांनी रोज ‘या’ 2 भागांवर लावावे मोहरीचे तेल, होतील आश्चर्यकारक फायदे

Spinach Nutrient Rich Soup Recipe | हिवाळ्यात प्या पोषक तत्वांनी भरलेले ‘हे’ चीज सूप, जाणून घ्या याची रेसिपी

Health Benefits of Clove | पचनक्रिया, लठ्ठपणा आणि दातदुखीमध्ये खुपच फायदेशीर ठरते लवंग, जाणून घ्या

Leave A Reply

Your email address will not be published.