Foods To Not Refrigerate | तुम्ही सुद्धा फळे फ्रिजमध्ये ठेवता का? जाणून घ्या कोणती फळे फ्रिजमध्ये ठेवू नयेत

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – Foods To Not Refrigerate | फळे (Fruits) आणि भाज्या (Vegetables) जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये (Refrigerator) ठेवता येऊ शकतात. फळे आणि भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्याने ताज्या राहतात, खराब होण्याची शक्यता कमी असते. अनेकदा आपण आठवडाभराच्या भाज्या किंवा फळे आणतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो, ज्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका कमी होतो. (Foods To Not Refrigerate)

पण तुम्हाला माहीत आहे का, सगळीच फळे फ्रीजमध्ये ठेवली जात नाहीत. अशीही काही फळे आहेत जी फ्रीजमध्ये ठेवल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. काही हंगामी फळे अशी असतात की, जी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचा प्रभाव बदलतो, चव बदलते. अशी कोणती फळे आहेत जी फ्रीजमध्ये ठेवल्याने आरोग्यावर परिणाम होतो ते जाणून घेवूयात…

1. केळीचा प्रभाव बदलतो :
केळी उप उष्णकटिबंधीय भागात पिकतात जेथे हवामान उबदार असते. केळीवर जास्त उष्णतेचा परिणाम सुद्धा होत नाही. जर केळी फ्रीजमध्ये ठेवली तर ती लवकर खराब होतील. केळी काळी पडतात, आणि ती लवकर सडू लागतात.

2. फ्रीजमध्ये ठेवू नका संत्री :
संत्री फ्रीजमध्ये ठेवू नये, विशेषतः हिवाळ्यात. सायट्रिक अ‍ॅसिड असलेली फळे आणि भाज्या फ्रीजचा गरवा सहन करू शकत नाहीत. फ्रीजमध्ये संत्री ठेवल्यास सर्दी-तापाची समस्या होऊ शकते. संत्र्याप्रमाणे लिंबू आणि मोसंबी फ्रिजमध्ये ठेवू नये. (Foods To Not Refrigerate)

3. सफरचंद फ्रीजमध्ये ठेवू नका :
सफरचंद फ्रीजमध्ये ठेवू नयेत. सफरचंदांमध्ये सक्रिय एंजाइम असतात, ज्यामुळे सफरचंद थंड ठिकाणी जलद पिकू शकतात.
सफरचंद उन्हाळ्यात थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवल्यास ते कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा.

4. एवोकॅडो फ्रीजमध्ये ठेवू नका :
एवोकॅडोमध्ये फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते, तसेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते.
फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा बाहेरचा भाग कडक होतो आणि आतील भाग खराब होऊ लागतो.

5. ही फळे फ्रीजमध्येही ठेवू नका :
पीच, आलू बुखारा, चेरी ही फळे उन्हाळ्यात जन्माला येतात, ती रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास त्यांची चव कमी होते.

Web Title :- Foods To Not Refrigerate | which fruits should not be kept in the fridge know about these fruits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Benefits Of Mustard Oil | पुरुषांनी रोज ‘या’ 2 भागांवर लावावे मोहरीचे तेल, होतील आश्चर्यकारक फायदे

Spinach Nutrient Rich Soup Recipe | हिवाळ्यात प्या पोषक तत्वांनी भरलेले ‘हे’ चीज सूप, जाणून घ्या याची रेसिपी

Health Benefits of Clove | पचनक्रिया, लठ्ठपणा आणि दातदुखीमध्ये खुपच फायदेशीर ठरते लवंग, जाणून घ्या

Leave A Reply

Your email address will not be published.