Pune Metro | पुणे मेट्रो लवकरच धावणार; जाणून घ्या ‘स्पीड’ आणि ‘चार्जेस’

0

पुणे :  एन पी न्यूज 24  – पुण्यातील मेट्रोचे (Pune Metro) काम पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे पुणेकरांची मेट्रो (Pune Metro) लवकरच धावणार आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय पर्यंत (vanaz corner to garware college metro station) सायकल, रिक्षा, दुचाकी अगदी कसेही आले तरी अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो. मात्र याच मार्गावरची मेट्रो हे अंतर केवळ 12 मिनीटात पार करणार आहे. तेही विना खोळंबा आणि 940 प्रवाशांना घेऊन.

पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांनाही (Pimpri-Chinchwad) चकीत करतील अशा अनेक गोष्टींचा समावेश पुणे मेट्रोमध्ये (Pune Metro) करण्यात आला आहे. म्हणजे वातानुकूलित डबे (AC coaches), जे स्थानक येईल त्या स्थानकाच्या नावाचा डब्यात डिस्प्ले, त्याची ध्वनीमुद्रीत घोषणा या नेहमीच्या गोष्टी तर पुणे मेट्रोत आहेत. याशिवाय महामेट्रोने (Maha Metro) पुणेकरांची आवडनिवड लक्षात घेत काही गोष्टी नव्याने केल्या आहेत.

स्थानकाचा आकार ‘मावळी पगडी’ सारखा
छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) उद्यानातील मेट्रो स्थानकाचा बाह्याकार हा मावळी पगडी सारखा असणार आहे. गरवारे महाविद्यालय आणि त्या पूर्वीच्या स्थानकांना मेट्रोचाच आकार असणार आहे. पिंपरी चिंचवडमधील स्थानकांना उद्योगनगरीची चाके असतील तर बालगंधर्व (Balgandharva Pune) जवळचा तारांचा पूल देवी सरस्वतीच्या विणेच्या आकाराचा असणार आहे. तसेच वैशिष्ट्यपूर्ण थोर ऐतिहासिक व्यक्तींचे चित्रदर्शन देखील प्रत्येक स्थानकांवर प्रवाशांना पहायला मिळणार आहे.

 

वृद्ध प्रवाशांसाठी लिफ्टची सोय
स्थानकाच्या बरोबर खालील जागेत बस, रिक्षा थांबे असतील. तसेच तरुणांसाठी सायकलींचीही माफक शुल्कात व्यवस्था असणार आहे. प्रवाशांना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी साधा जिना, सरकता विद्युत जिना आणि महत्त्वाचे म्हणजे वृद्ध प्रवाशांसाठी लिफ्टची सोय करण्यात आली आहे. याशिवाय दिव्यांग प्रवाशांसाठी देखील स्वतंत्र व्यवस्था आहे.

मेट्रोचा वेग
पुणे मेट्रो प्रतितास 90 किलोमीटर या वेगाने धावण्याची क्षमता आहे. सुरुवातीचे काही महिने प्रतितास 40 किमी या वेगाने मेट्रो धावणार आहे. 800 ते 1125 मीटरवर एक स्थानक अशी रचना आहे. प्रत्येक स्थानकावर किमान 20 व कमाल 30 सेकंद गाडी थांबणार आहे.

3 डब्यांची एक गाडी
पुणे मेट्रोला 3 डबे असतील. तिची प्रवासी क्षमता 940 आहे.
यातील 192 प्रवासी आसनस्थ तर उर्वरीत उभे असतील.
प्रवाशांच्या संख्येनूसार नंतर गाडी 6 डब्यांची होईल.
स्थानकांचे फलाट आताच या आकारात (140 मीटर लांब 21 मीटर रुंद) बांधण्यात आले आहेत.

 

प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
महामेट्रोने प्रवाशांच्या सुरक्षेला (Safety) सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
सर्व गाड्यांमध्ये अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा आहे. प्रत्येक डब्यात एक फोन असेल.
आणीबाणीच्या क्षणी तो लावला तर थेट स्थानक प्रमूख तसेच सुरक्षा व्यवस्थेबरोबर बोलता येणार आहे.
तसेच आग प्रतिबंधक व अन्य सुविधा असणार आहेत.

मेट्रोटे तिकीटदर

पहिल्या 2 किमीसाठी – 10 रुपये

2 ते 4 किमीसाठी – 20 रुपये

4 ते 12 किमीसाठी – 30 रुपये

12 ते 18 किमीसाठी – 40 रुपये

हे दर मेट्रो सुरु झाल्यानंतर पहिल्या वर्षासाठी असणार आहेत. यामध्ये वाढ करता येणार नाही.

Web Title :- Pune Metro | pune metro run soon find out speed limit ticket price vanaz corner to garware college metro station

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PM Awas Scheme | ‘पीएम आवास’मध्ये तुम्हाला घर मिळाले नाही का? येथे अशी करा तक्रार, ताबडतोब होईल सुनावणी

Delhi High Court | ‘लग्नानंतर शारीरिक संबंधांची अपेक्षा ठेवणं योग्य, अविवाहित जोडप्यांना तो अधिकार नाही’ : दिल्ली उच्च न्यायालय

PM Gareeb Kalyan Yojana | पंतप्रधान गरीब कल्याण योजना 2022 : PMGKY च्या नवीन अपडेट विषयी जाणून घ्या सविस्तर

Leave A Reply

Your email address will not be published.