PM Gareeb Kalyan Yojana | पंतप्रधान गरीब कल्याण योजना 2022 : PMGKY च्या नवीन अपडेट विषयी जाणून घ्या सविस्तर

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थ मंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PM Gareeb Kalyan Yojana) सुरू केली आहे. गरीब लोकांसाठी सरकारने ही योजना 2016 पासून सुरू केली आहे. कोरोना (Coronavirus) महामारीमुळे केंद्र सरकारने 26 मार्च 2020 रोजी ही योजना पुन्हा सुरू केली. पीएम गरीब कल्याण योजनेची नवीन घोषणा, योजनेचा उद्देश, योजनेतून मिळालेल्या सुविधा, योजनेचे फायदे, अन्न योजना 2.0 मध्ये उपलब्ध सुविधा, नोंदणी प्रक्रिया याबाबत सविस्तर जाणून घेवूयात. (PM Gareeb Kalyan Yojana)

कोरोना काळात PMGKY अंतर्गत गरीब लोकांसाठी 1.7 लाख कोटींचे मदत पॅकेज देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. जे 80 कोटी गरीब रेषेखाली आहेत, त्या शिधापत्रिकाधारकांना 3 महिन्यांसाठी मोफत धान्य दिले. त्या लोकांना मोफत पैसे आणि गॅस सिलिंडरही दिले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या वर्षी 7 जून 2021 रोजी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दिवाळीपर्यंत 80 कोटी गरीब लोकांना दरमहा ठराविक प्रमाणात मोफत धान्य वाटप करण्याची घोषणा केली होती.

पंतप्रधान गरीब कल्याण योजना 2022 (PM Gareeb Kalyan Yojana)
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सरकार लोकांना नोव्हेंबरपर्यंत मोफत रेशनचे वाटप करणार आहे. ज्यामध्ये 1 किलो चना डाळ, 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू मिळेल. नोव्हेंबरपर्यंत गरीब लोकांना मोफत रेशन देण्यासाठी 90 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. आता पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशनचे वाटप करण्यासाठी सर्व लाभार्थी कुटुंबांना आता कापडी पिशवीत रेशन दिले जाणार आहे. या कापडी पिशवीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र असेल. ही कापडी पिशवी देखील विनामूल्य असेल.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत देशातील शिधापत्रिकाधारकांना लाभ मिळावा यासाठी गेल्या वर्षी मे आणि जून महिन्यात कोरोना महामारीच्या काळात भारत सरकारकडून मोफत रेशनचे वाटप करण्यात आले होते. या मोफत रेशन योजनेचा लाभ देशातील 80 कोटींहून अधिक कुटुंबांना देण्यात आला. या योजनेद्वारे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 5-5 किलो रेशन मोफत दिले जात होते. या योजनेसाठी केंद्र सरकारने सुमारे 26 हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. बीपीएल शिधापत्रिकाधारकांना संकटाच्या वेळी मदत करण्यासाठी भारत सरकारने हे पाऊल उचलले आहे.

 

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना नवीन अपडेट (PM Gareeb Kalyan Yojana New Updates)

अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2022 रोजी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करताना,
देशातील गरीब लोकांसाठी ज्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय आहे,
अशा 80 कोटी गरीब देशवासीयांसाठी, गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत,
दिवाळीपर्यंत दररोज दर महिन्याला विहित प्रमाणात मोफत धान्य वाटप करण्याची
घोषणा केली आहे. या योजनेचा उद्देश एवढाच आहे की देशातील कोणत्याही गरीब व्यक्ती किंवा कुटुंबाला उपासमारीची वेळ येऊ नये आणि या योजनेंतर्गत मोफत धान्य वाटप करून सरकार गरीब लोकांना अन्नाचा पुरवठा करू शकेल.

Web Title :- PM Gareeb Kalyan Yojana | Pradhan Mantri Garib Kalyan Yojana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Covid Test | कोरोना रूग्णाच्या संपर्कात येणार्‍यांना टेस्ट करण्याची आवश्यकता नाही, जोपर्यंत जास्त जोखीम नसेल; केंद्राने जारी केली नवीन अ‍ॅडव्हायजरी

Maharashtra Police Corona | राज्य पोलीस दलाला कोरोनाचा ‘विळखा’ ! एकाच दिवसात 298 पोलीस बाधित, 2 डोस घेतल्यानंतरही 1625 पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांना लागण

Sinhagad Fort Pune | सिंहगड किल्ल्यावर आता नागरिकांना ‘नो एन्ट्री’

Leave A Reply

Your email address will not be published.