PM Awas Scheme | ‘पीएम आवास’मध्ये तुम्हाला घर मिळाले नाही का? येथे अशी करा तक्रार, ताबडतोब होईल सुनावणी

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हीही पीएम आवास (PM Awas Scheme) योजनेसाठी पात्र असाल आणि अर्ज केला असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असू शकते. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना घरे दिली जातात. केंद्र सरकारने (Central Government) ही योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत बेघर लोकांना राहण्यासाठी घरे दिली जातात. मात्र PM Awas Scheme योजनेत अर्ज करूनही घर मिळाले नाही किंवा इतर कोणत्याही मार्गाने अडचण आली तर तक्रार कुठे करावी आणि योजना काय आहे ते जाणून घेवूयात…

केंद्र सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत गरीबांना घरे मिळावीत म्हणून आर्थिक दुर्बल लोकांना घरे देण्यासाठी शासन आर्थिक मदत करते. याअंतर्गत 2022 पर्यंत झोपडपट्टी, कच्च्या घरांमध्ये राहणार्‍या लोकांसाठी घरांची कमतरता दूर करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. एवढेच नाही तर या योजनेंतर्गत सरकार लोकांना कर्ज आणि सबसिडीची सुविधाही देते. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला पीएम आवास योजनेच्या पोर्टलवर ऑनलाइन किंवा ग्राम विकास अधिकारी यांच्यामार्फत ऑफलाइन अर्ज करावा लागेल.

तक्रारीचे 45 दिवसांत निराकरण केले जाते
जर तुम्हाला या योजनेअंतर्गत तक्रार करायची असेल तर तुम्ही हे काम सहज करू शकता. यासाठी तुम्हाला प्रत्येक ग्रामपंचायत, गट, जिल्हा आणि राज्य स्तरावर तक्रार करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तुम्ही थेट कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवू शकता. तक्रारीच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत तुमच्या समस्यांचे निराकरण केले जाते. दुसरीकडे, या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती किंवा तक्रार करायची असल्यास, तुम्ही गटविकास अधिकार्‍यांशीही संपर्क साधू शकता. (PM Awas Scheme)

 

तुम्ही ऑनलाइन तक्रारही करू शकता
पीएम आवास योजनेंतर्गत ऑनलाइन सुविधाही दिली जाते.
अशा परिस्थितीत तुम्ही प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले पीएम आवास योजना अ‍ॅप डाउनलोड करून या सुविधांचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुम्ही ती अ‍ॅपद्वारे करू शकता.

यासाठी तुम्हाला लॉगिन आयडी बनवावा लागेल.
येथे तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल, त्यावर ओटीपी येईल, तो नोंदवून तुम्ही लॉगिन करू शकता.
याशिवाय वेबसाइटवरून तक्रार नोंदवू शकता. तसेच, तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास किंवा या योजनेबद्दल जाणून घ्यायचे असल्यास, तुम्ही पीएम आवास योजनेच्या 1800-11-3377 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता; 1800-11-3388; तुम्ही 1800-11-6163 वर कॉल करू शकता.

Web Title :- PM Awas Scheme | you did not get home in pm awas scheme complain here like this way

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Delhi High Court | ‘लग्नानंतर शारीरिक संबंधांची अपेक्षा ठेवणं योग्य, अविवाहित जोडप्यांना तो अधिकार नाही’ : दिल्ली उच्च न्यायालय

PM Gareeb Kalyan Yojana | पंतप्रधान गरीब कल्याण योजना 2022 : PMGKY च्या नवीन अपडेट विषयी जाणून घ्या सविस्तर

Covid Test | कोरोना रूग्णाच्या संपर्कात येणार्‍यांना टेस्ट करण्याची आवश्यकता नाही, जोपर्यंत जास्त जोखीम नसेल; केंद्राने जारी केली नवीन अ‍ॅडव्हायजरी

Leave A Reply

Your email address will not be published.