Covid Test | कोरोना रूग्णाच्या संपर्कात येणार्‍यांना टेस्ट करण्याची आवश्यकता नाही, जोपर्यंत जास्त जोखीम नसेल; केंद्राने जारी केली नवीन अ‍ॅडव्हायजरी

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Covid Test | देशातील कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) च्या वाढत्या प्रकरणांमध्ये सोमवारी कोविड सॅम्पल (Covid Samples) टेस्ट च्या ताज्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (Indian council of medical research) म्हटले आहे की, कोविड रुग्णांच्या (Covid Patients) संपर्कात आलेल्यांना तोपर्यंत टेस्ट करण्याची आवश्यकता नाही, जोपर्यंत त्यांना वय किंवा कॉमोरबिडीटीचा आधारावर हाय रिस्क (High Risk) म्हटले जाणार नाही. (Covid Test)

ICMR च्या निवेदनात म्हटले आहे की, होम आयसोलेशननंतर डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची किंवा कोविड-19 सुविधेतून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची चाचणी करण्याची गरज नाही. तथापि, खोकला, ताप, घसा खवखवणे किंवा चव किंवा वास कमी होणे आणि इतर कोविड लक्षणे असलेल्या लोकांनी टेस्ट करणे आवश्यक आहे. यासोबतच 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या किंवा मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुस किंवा किडनीचे आजार इत्यादी आजार असलेल्या व्यक्तींचीही तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. (Covid Test)

रुग्णालयांसाठी, ICMR ने निर्देश दिले आहेत की टेस्टच्या अभावामुळे कोणत्याही आपत्कालीन प्रक्रियेस विलंब होऊ नये.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, रविवारी देशभरात 13.52 लाख सॅम्पलची टेस्ट घेण्यात आली.
देशात महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत 69.16 कोटींहून अधिक सॅम्पलची टेस्ट करण्यात आली आहे

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Web Title :- Covid Test | if there is no more risk then there is no need to get the test done if you come in contact with the corona patient center issued a new advisory

Maharashtra Police Corona | राज्य पोलीस दलाला कोरोनाचा ‘विळखा’ ! एकाच दिवसात 298 पोलीस बाधित, 2 डोस घेतल्यानंतरही 1625 पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांना लागण

Sinhagad Fort Pune | सिंहगड किल्ल्यावर आता नागरिकांना ‘नो एन्ट्री’

EPFO E-Nomination | ई-नॉमिनेशन झाले अनिवार्य, याशिवाय आता पाहता येणार नाही तुमच्या PF खात्याचा बॅलन्स

Gold Silver Price Today | खूशखबर ! आजही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Pune Cyber Crime | पुण्यात सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (ACP) सायबर चोरट्याने घातला गंडा

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळ लागोपाठ दुसर्‍या दिवशी अपघात; बोअरवेल ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ‘विजय कुलकर्णी’ जागीच ठार

Omicron Symptoms | ओमिक्रॉनचे ‘हे’ लक्षण सर्वप्रथम दिसून येते, व्हॅक्सीन घेतलेल्या लोकांमध्ये सुद्धा दिसतोय ‘हा’ संकेत

Leave A Reply

Your email address will not be published.